ATM मधून चार व्यवहारानंतर पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारावर 173 रुपये द्यावे लागणार का? बघा, काय आहे विषय
मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेहमीच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असते. प्रत्येकवेळी निर्णय घेताना रिझर्व्ह बँक इंडिया (RBI) इतर बँकांना आधी सूचना करते. सध्या सोशल मीडियाच्या या दुनियेत मात्र रिझर्व्ह बँकेच्या नावाने मात्र अनेक अफवा दर्शक मेसेजस सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात (ATM Transaction) असाच एक मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जर एटीएममधून पैसे काढले तर 173 रुपये शुल्क आकारलं जाणार.
RBI आणि केंद्र सरकार बँकांच्या विविध सेवा शुल्कांबाबत निर्णय घेतात तेव्हा त्या प्रकारच्या बदलाबद्दल आरबीआय किंवा बँकां त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देत असतात. मात्र एटीएममधून चार वेळेस पैसे काढल्यानंतर एकूण 173 रुपये द्यावे लागतील असा मेसेज व्हायरल झाला आहे. या मेसेजबद्दल आता सत्यता पडताळून घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मेसेजमध्ये सांगण्यात आलेली माहिती ही खोटी आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नियमांनुसार बँकेतून पाच व्यवहार आपण कोणत्याही चार्जशिवाय करू शकतो.
यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी बँकेकडून जास्तीत जास्त 21 रुपये आणि कोणताही कर असल्यास तो स्वतंत्रपणे भरावा लागेल. आपल्या बँक खात्यातील शिल्लक एटीएममधून तपासण्यापासून ते मिनी स्टेटमेंट किंवा पिन बदलण्यापर्यंत सर्व गैरव्यवहार हे मोफत आहेत आणि त्यासाठी कसलाही चार्ज बँकेकडून आकारता येत नाही.
देशातील मेट्रो शहरे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे तीन व्यवहार विनामूल्य आहेत आणि नंतरच्या व्यवहारांवर चार्जेस लावण्यात आलेले आहेत.