सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सरकारी नोकरदारांच्या अनुकंपा नियुक्त्यांच्या धोरणाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सेवेत असताना मृत्यू झालेल्या, तसेच वैद्यकीय कारणास्तव निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही अनुकंपाद्वारे नोकरी मिळणार आहे..
सरकारी कर्मचाऱ्याच्या मागे त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीवर मात करता यावी, यासाठी मृत कर्मचाऱ्याच्या नातवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणार्या सर्व सरकारी कर्मचार्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे..
निमलष्करी दलाच्या जवानांचाही समावेश
गृह मंत्रालयाच्या सुधारित तत्त्वांनुसार, केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचाही या योजनेत समावेश असणार आहे. अनेकदा दहशतवादी हल्ले, चकमकीत किंवा अनेक जवान आत्महत्यांसारखे पाऊल उचलतात.. त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाईल. तसेच वैद्यकीय कारणास्तव निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही अनुकंपाद्वारे नोकरी मिळेल.
गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे एकूण मूल्यमापन, कमावणारे सदस्य, कुटुंबाचा आकार, मुलांचे वय आदी बाबींचा विचार करुन अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.. वरील बदलांमुळे अनुकंपा नियुक्तीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असे सांगण्यात आले…
दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली जाते.. राज्य सरकारनेही आपल्या या धोरणास गती देण्यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आहे. त्यानुसार, एकूण पदांपैकी 20 टक्के जागा अनुकंपा नियुक्तीने भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.