SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ पत्र होतेय सोशल मीडियावर व्हायरल; ‘असा’ आहे पत्रातील मजकूर

मुंबई :

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडून येत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभेत मात्र शिवसेना बंडखोर आणि शिवसेनेच्या 14 आमदारांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात गेला असून सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही कारवाईसाठी सध्या परवानगी दिलेली नाही. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसोबत असणाऱ्या 14 निष्ठावंत आमदारांना भावनिक पत्र लिहले आहे. या पत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांचे संकटकाळात शिवसेनेला साथ दिल्याबद्दल आभार मानले आहे.

Advertisement

 

हे पत्र सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहे. शिवसेनेचे राहिलेले आमदारही बंडखोर शिवसेना गटाला मिळतील असं बोललं जात होतं. मात्र असं काहीही न झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे पत्र आपल्या निष्ठावंत आमदारांना लिहले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे की शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा व अस्मितेची महती शिवसेना प्रमुखांनी आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.

Advertisement

 

शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिले. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिले. आपल्या या भूमिकेनेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला. व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो, अशा आशयाचा मजकूर या पत्रात लिहलण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरेंनी हे पत्र आपल्या निष्ठावंत आमदारांना लिहल्यानंतर आमदारांनी देखील पक्षप्रमुखांचे आभार मानले आहे.

Advertisement