मुंबई :
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत नौदलातील अग्निविरांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. एकूण 2 हजार 800 पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा 23 वर्षांपर्यंत आहे. संपूर्ण देशभरात ही भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022 असणार आहे. indiannavy.nic.in या अधिकृत संकेस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकतो.
अग्निपथ योजने अंतर्गत होणाऱ्या भरतीसोबतच भारत सरकारच्या अजून एक सरकारी खात्यामध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. कोल इंडिया लिमिटेड(Coal India)मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी (यात खाणकाम, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, प्रणाली आणि EDP यांचा समावेश होतो) भरती होणार आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी शैक्षणिक पात्रता B.E./B.Tech/B.Sc अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे. यामध्ये एकूण 1 हजार 50 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
699, सिव्हिलसाठी 160, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचारसाठी 124, प्रणाली आणि EDP साठी 67 जागांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 30 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2022 असणार आहे. https://www.coalindia.in या वेबसाईटवर गेल्यावर career with cil वर क्लिक केल्यानंतर jobs at coal india पर्याय समोर येईल. या पर्यायावर क्लीक केल्यानंतर Recruitment of Management Trainee on the basis of GATE-2022 Score या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.