चहा.. भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य घटक.. घरात कोणी पै-पाहुणा आला, तरी त्यांचा पाहुणचार चहानेच केला जातो.. चहाला कोणीही विचारलं तरी, शक्यतो कोणी नाही म्हणत नाही.. मात्र, काही जण फक्त चहाच पितात, तर बऱ्याच जणांना चहासोबत काहीतरी खाण्याची आवड असते..
चहासोबत काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतं.. चहासोबत हे पदार्थ खाल्याने तुम्हाला आरोग्याबाबत अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
चहासोबत ‘हे’ खाऊ नका…
ड्राय फ्रुटस् : चहासोबत अनेकांना ‘ड्राय फ्रुटस्’ खायला आवडतं.. मात्र, ‘ड्राय फ्रूट्स’मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. दुधासोबत लोह न खाण्याचा सल्ला दिला जातो.. दुधाच्या चहासोबत ‘ड्राय फ्रुट्स’ खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो..
लोहयुक्त भाज्या : चहामध्ये ‘टॅनिन’ व ‘ऑक्सलेट’ असतात. जे लोहयुक्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंध करतात. त्यामुळे चहासोबत कधीही हिरव्या पालेभाज्या, तृणधान्ये, कडधान्ये असे लोहयुक्त पदार्थ खाऊ नये.
लिंबू : अनेकांना ‘लेमन टी’ प्यायला आवडतं.. त्यामुळे वजन कमी होत असल्याचं सांगितलं जातं. परंतु हा चहा आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. चहात लिंबाचा रस मिसळल्याने ते ‘अॅसिडिक’ बनते.. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू चहा प्यायल्यास छातीत जळजळ होऊ शकते.
भजी-समोसा-वडे – पावसाळ्यात बरेच जण चहासोबत भजी, समोसे, वडे खातात.. मात्र, चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचनाची समस्या निर्माण होते. पोषक तत्वे शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी होते. त्यामुळे कधीही असे पदार्थ चहासोबत खाऊ नयेत..
हळद : चहासोबत हळदीचे पदार्थ खाणे टाळावेत. त्यामुळे पोटात गॅस, अॅसिडीटी किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू शकतात..
थंड पदार्थ : गरम चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नये. त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया कमकुवत होते.. गरम चहा पिल्यानंतर किमान 30 मिनिटे काहीही थंड खाऊ नये..
टीप – वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.. डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा..