SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

WhatsApp मध्ये येणार आता ‘हे’ फीचर; एकाच वेळी दोन फोनमध्ये अकाउंट वापरता येणार

WhatsApp आपल्या युजर्सना नेहमीच काही ना काही फीचररुपी भेट देत असतो. गेल्याकाही दिवसात WhatsApp ने अनेक फीचर्स आपल्या अपडेटमध्ये आणले आहेत. यूजर्स ज्या फीचरची गेल्याअनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत, ते फीचर देखील लवकरच युजर्ससाठी आता उपलब्ध होणार आहे. सध्या एकच WhatsApp अकाउंट दोन मोबाईलमध्ये चालत नाही. परंतू, ही समस्या आता लवकरच समाप्त होणार आहे. WhatsApp एकच अकाउंट दोन फोनवर वापरता यावे, यासाठी एक नवीन फीचर जारी करणार आहे.

कंपनीने मागील काही दिवसांमध्ये लाँच केलेल्या फीचर्समध्ये WhatsApp अकाउंट प्रायमरी डिव्हाइस व्यतिरिक्त इतर 3 ठिकाणी केवळ वेब व्हर्जनवरच याचा वापर करता येतो. इतर स्मार्टफोनमध्ये हेच अकांउंट उघडता येत नाही.

Advertisement

दोन फोनमध्ये WhatsApp अकाउंट वापरण्यासाठी यूजर्सला वेगवेगळ्या ट्रीक्सची मदत घ्यावी लागते. मात्र आता असं काहीही करावं लागणार नाही. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp नवीन फीचर Companion Modeवर सध्या काम करत असून लवकरच हे फीचर युजर्सना वापरण्यासाठी मिळेल.

या फीचरच्या मदतीने प्रायमरी डिव्हाइस व्यतिरिक्त अन्य डिव्हाइसवर देखील चॅट हिस्ट्रीला सिंक करता येणं शक्य होणार आहे. WhatsAppने मागच्या अपडेटमध्ये स्क्रीनशॉटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कनेक्टेड डिव्हाइससह चॅट हिस्ट्रीला सिंक करता येण्याचं फीचर भेट दिलं होतं. दरम्यान आता , WhatsApp आपल्या यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स देण्यासाठी नवनवीन फीचर रोलआउट करणार आहे. आगामी काळात येणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरमध्ये व्हिडिओ कॉल दरम्यान अवतारची निवड करणे, डिलीट मेसेज फॉर एव्हरीवनसाठी टाइम वाढवणे व अँड्राइडसाठी अ‍ॅनिमेटेड हार्ट इमोजी या फीचर्सचा समावेश असणार आहे.

Advertisement