SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरपंच-नगराध्यक्ष निवडीबाबत शिंदे सरकारने दिले ‘हे’ आदेश, काय बदल होणार..?

गावाच्या-शहराच्या राजकारणात होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने जनतेतून सरपंच व नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 2019 मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. त्यानंतर राज्यात पुन्हा सत्तांतर होऊन शिंदे व फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले..

राज्यात सत्तांतर होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ग्रामविकास व नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.. त्यात पुन्हा एकदा सरपंच व नगराध्यक्षांची निवड जनतेतून करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Advertisement

पुढील 6 महिन्यांत कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, याचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.. त्यानुसार, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात एकूण 27,783 ग्रामपंचायती असून, डिसेंबर-2022 पर्यंत जवळपास 10 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.. बहुमतातून सरपंच, नगराध्यक्ष निवडून येणे भाजपसाठी कठीण आहे.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत कोणाचेही असो, प्रमुख आपलाच असेल, असा त्यांचा हेतू असल्याची टीका विरोधकांनी टीका केली आहे.

Advertisement

जिल्हा परिषदांना मुदतवाढ…

दरम्यान, राज्यात अनेक जिल्हा परिषदांची मुदत संपली आहे. त्यात अमरावती, चंद्रपूर, सातारा, जालना, रत्नागिरी, बीड, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, बुलढाणा, नांदेड, औरंगाबाद, वर्धा, लातूर, नाशिक, जळगाव, सोलापूर, नगर, यवतमाळ, रायगड, गडचिरोली आदींचा समावेश आहे.

Advertisement

ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांची निवडणूक पुढील टप्प्यात होणार आहे. जुलै-2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 6 जिल्हा परिषद अध्यक्षांना एक महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने फडणवीस यांच्याकडे पाठविल्याची माहिती मिळाली..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement