SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महागाईचा भडका! ‘या’ लोकप्रिय कंपनीच्या गाड्या महागणार

मुंबई :

भारतात सध्या वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन कंपन्यांच्या वर्चस्वाची लढाई सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. परदेशी कंपन्यांना मागे टाकून टाटा आणि महिंद्रा या दोन कंपन्यांनी मागील वर्षी आणि चालू वर्षात विक्रमी गाड्यांची विक्री केली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्सकडून गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जवळपास सर्वच वाहन कंपन्या सातत्याने वाहनांच्या किंमती वाढवत असल्याने टाटा मोटर्सने देखील किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

टाटा मोटर्सने वाहनांच्या वाढलेल्या किंमतीबाबत आजपासून अंबलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. टाटाच्या Tata Nexon, Tata Panch, Tata Altroz, Tata Harrier, Tata Safari, Tata Tiago आणि Tata Tigor तसेच Nexon EV आणि Tigor EV या लोकप्रिय गाड्यांची किंमत वाढवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सने याआधी देखील मागच्या महिन्यात गाड्यांच्या किंमती वाढवल्या होत्या. वाढत्या इनपुट कॉस्टमुळे आम्हाला हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत आहे असं टाटा मोटर्सने त्यावेळी स्पष्टीकरण दिलं होतं. कंपनीने आत्ताच्या दरवाढीनंतर देखील हेच कारण दिल्याचं समोर आलं आहे.

Advertisement

ग्राहकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून कमाल किंमत न वाढवता किमान किंमत वाढवण्यात आली आहे. कंपनीने जुलै 2022 मध्ये केलेल्या दरवाढीमुळे त्यांच्या सर्व वाहनांच्या किंमतीत किमान 2000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. टाटाच्या महागड्या गाड्यांच्या किंमतीमध्ये 3000 ते 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टाटा मोटर्स भारतात त्यांच्या परवडणाऱ्या हॅचबॅक टियागो, टिगॉर सेडानपासून ते हॅरियर एसयूव्हीपर्यंत नऊ ते दहा गाड्यांची विक्री करते. टाटाकडे इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारही आहेत.

Advertisement