SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिवसेनेच्या 53 आमदारांना दणका, विधीमंडळ सचिवांनी नोटीसा बजावल्या….!!

शिवसेना नेमकी कोणाची, तसेच बंडखोर आमदारांवर काय कारवाई होणार, याचा निवाडा उद्या (ता. 11) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.. मात्र, त्याआधीच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.. विधीमंडळ सचिवांनी या दोन्ही गटातील शिवसेनेच्या आमदारांना दणका दिला आहे..

शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाच्या 55 पैकी 53 आमदारांना विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे.. दोन्ही गटांनी एकमेकांचा ‘व्हीप’ (पक्षादेश) झुगारल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली. या नाेटिशीला आमदारांना पुढील 7 दिवसांत उत्तर द्यावं लागणार आहे..

Advertisement

आदित्य ठाकरेंना वगळले…

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक व त्यानंतर झालेला विश्वासदर्शक ठरावासाठी ठाकरे व शिंदे गटातर्फे ‘व्हीप’ बजावण्यात आला होता. मात्र, त्याचं उल्लंघन केल्याचा दावा दोन्ही गटांनी केला होता. त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. शिंदे गटानं आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केली नव्हती, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली नाही.

Advertisement

शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आदित्य ठाकरे सभागृहाबाहेर होते. मात्र, त्यांना ही नोटीस देण्यात आलेली नाही. आपलाच व्हीप अधिकृत असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे.. त्यामुळे ‘व्हीप’ झुगारणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दोन्ही गटांनी केलीय. सात दिवसांत आमदारांना त्यावर उत्तर द्याव लागणार आहे..

उद्धव ठाकरे यांच्या गटाने ‘व्हीप’चं उल्लंघन झाल्याची तक्रार तत्कालीन पीठासीन अधिकार नरहरी झिरवळ यांनी रेकॉर्डवर घेतली होती.. त्यानंतर नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शिंदे गटाच्या व्हिपचं उल्लंघन झाल्याची बाब रेकॉर्डवर घेतली.. त्याआधारे विधिमंडळ सचिवांनी या नोटिसा बजावल्या आहेत.

Advertisement

अर्थात, शिवसेनेतल्या गटनेते पदाची खरी लढाई सुप्रीम कोर्टातच होणार आहे. सोबतच 16 आमदारांच्या निलंबनासह एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या तक्रारीवर सुप्रीम कोर्टात 11 तारखेला सुनावणी होणार आहे.. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement