SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! टाटा उद्योग समूह आणणार ‘या’ कंपनीचा आयपीओ

देशभरात टाटा उद्योग समूहाच्या कंपन्यांबाबत सध्या जोरदार सकारत्मक चर्चा सुरु आहे. टाटा कन्सल्टन्सी, टाटा स्टील आणि टाटा मोटर्स या कंपन्या कमालीच्या नफ्यामध्ये आहेत. अशातच आता टाटा उद्योगसमूहाने एका सरकारी कंपनीची देखील खरेदी केली आहे. जवळपास 18 वर्षानंतर टाटा समूहातील एक कंपनी आता शेअर बाजारात येणार आहे. टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात धडक देणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि डिजीटल सर्व्हिस यांच्याशी संबंधित एक कंपनी आहे.

जर समजा टाटा मोटर्सकडून या कंपनीचा आयपीओ बाजारात आला तर टाटा समूहाकडून 2004 नंतर येणारा हा पहिलाच आयपीओ ठरेल. 18 वर्षांपूर्वी टाटा समूहातील आणि देशातील मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसचा आयपीओ शेअर बाजारात आला होता. हा आयपीओ जेव्हा बाजारात आला तेव्हा सर रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष होते. एन. चंद्रशेखरन यांनी 2017 टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत एकाही कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आला नव्हता. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओचा आकार किती असेल हे अद्याप ठरवण्यात आलेलं नाही.

Advertisement

सध्या आयपीओची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या काही दिवसात आयपीओ प्रक्रियेत देशांतर्गत बँकांसह परदेशी बँकांनाही सामावून घेतले जाणार आहे. टाटा मोटर्सच्या वर्ष 2022 च्या वार्षिक अहवालानुसार, टाटा टेक्नॉलॉजीमध्ये टाटा मोटर्सचा 74 टक्के समभाग आहे. टाटा मोटर्सकडून यामधील 43 टक्के हिस्सा हा 360 दशलक्ष डॉलरमध्ये विकण्यात येणार होता. मात्र या प्रस्तावावर देखील अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे उत्पन्न 2021–22 मध्ये 3529.6 कोटी रुपये होते.

Advertisement