SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आठवी, दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, मुंबईत 445 जागांसाठी भरती..!!

नोकरीच्या शाेधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड’ मुंबई येथे काही जागांसाठी नोकर भरती होत आहे. याबाबतची अधिसूचना (Mazagon Dock Trade Apprentice Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत.

‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड’मध्ये होणाऱ्या या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 445

या पदांसाठी भरती

Advertisement

ट्रेड अप्रेंटिस – इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. आयटीआय फिटर), इलेक्ट्रिशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार, रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)

शैक्षणिक पात्रता

Advertisement

सुतार – अर्जदार केवळ वरील ट्रेडमध्ये ‘आयटीआय’ उत्तीर्ण झालेला असावा.
रिगर- उमेदवार आठवी उत्तीर्ण असावा, संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक.
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- उमेदवार आठवी पास, संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक.

अन्य रिक्त पदांसाठी उमेदवार दहावी पास असणं आवश्यक. तसेच, आयटीआय उत्तीर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.

Advertisement

आवश्यक कागदपत्रं

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –https://mazagondock.in/mdlapprentice/Login.aspx?msg=e

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement