SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कार घेण्याची हीच वेळ.. ‘मारुती’च्या ‘या’ कार्सवर मिळतोय ‘बंपर डिस्काऊंट’..!!

आयुष्यात प्रत्येकाचं कार घेण्याचं स्वप्न असतं.. खरं तर प्रत्येकासाठी हा आनंदाचा क्षण.. मात्र, अनेकदा बजेटमुळे इच्छा असूनही काहींना कार खरेदी करता येत नाही.. मात्र, आता बजेटची काळजी करण्याचे कारण नाही.. ‘मारुती’ कंपनीने आपल्या विविध कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट जाहीर केला आहे..

‘मारुती’च्या गाड्यांना नेहमीच ग्राहकांची पसंती राहिली आहे.. त्यात कंपनीकडून ‘बंपर डिस्काऊंट’ जाहीर करण्यात आलाय.. त्यामुळे तुमचा कार खरेदी करण्याचा विचार असेल, तर हीच खरी वेळ आहे.. ‘मारुती’च्या कोणत्या कारवर किती डिस्काऊंट मिळतोय, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

मारुती वॅगनआर (Maruti WaganR)

‘मारुती’ची सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणजे, ‘वॅगनआर’.. या कारवर तब्बल 74,000 रुपयांची सूट मिळतेय. त्यात 30,000 रुपये रोख, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, तसेच 1.0-लिटर इंजिन मॉडेलवर 6,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. शिवाय 1.2-लिटर इंजिन मॉडेलवर 10,000 रुपयांची रोख व 6,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळतेय.
मारुती स्विफ्ट (Maruti Swift)

‘मारुती’च्या प्रीमियम हॅचबॅक ‘स्विफ्ट’ कारवर एकूण 32,000 रुपयांची सूट मिळतेय. त्यात 15,000 रोख आणि 10,000 रुपये एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. शिवाय 7,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळत आहे.

Advertisement

मारुती अल्टो (Maruti Alto)

‘मारुती’ कंपनी लोकप्रिय हॅचबॅक ‘अल्टो-800’वर एकूण 31,000 रुपयांची सूट देत आहे. त्यात 10,000 रुपयांची रोख ऑफर असून, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. शिवाय 6,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळत आहे.

Advertisement

मारुती डिझायर (Maruti Dezire)

‘मारुती’च्या सबकॉम्पॅक्ट सेडान कारवर एकूण 34,000 ची सूट दिली जात आहे. त्यात 5,000 रुपये रोख, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, सोबतच 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही मिळणार आहे.. ‘टूर एस’ मॉडेलवर ग्राहकांना 10,000 रुपयांची रोख ऑफर व 14,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळेल.

Advertisement

मारुती सेलेरिओ (Maruti Celerio)

‘मारुती’च्या नुकत्याच लाँच झालेल्या ‘सेलेरिओ हॅचबॅक’वर तब्बल 51,000 रुपयांची सूट मिळतेय.. त्यात 30,000 रुपये रोख, 15,000 एक्सचेंज बोनस मिळेल.. तसेच 6,000 रुपयांचा बोनसही असेल..

Advertisement

मारुती एस प्रेसो (Maruti S-Presso)

या मॉडेलवर ‘मारुती’ एकूण 31,000 रुपयांची सूट देतेय. त्यात 10,000 रुपये रोख व 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. तसेच 6,000 चा बोनसदेखील उपलब्ध असेल…

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement