SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फायद्याची बातमी..!! ‘इन्कम टॅक्स’ वाचवण्यासाठी ‘येथे’ करा गुंतवणूक..

एका ठराविक मर्यादेपेक्षा जादा उत्पन्न झाले, की प्रत्येकालाच त्यावर आयकर अर्थात ‘इन्कम टॅक्स’ भरावा लागतो.. अर्थात, त्यातही अनेक पळवाटा आहे.. आयकरापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण या पळवाटा शोधत असतात.. आयकर वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणुका केल्या जातात..

खास करुन आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी फेब्रुवारी, मार्चमध्ये असे प्रकार सुरु असतात.. त्यातून घाई गडबडीत चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. त्यात फसवणूक झाल्यास पदरी मोठी निराशा पडते.. कायदेशीर मार्गाने, उपलब्ध विविध प्राप्तिकर सवलतींची माहिती घेऊनही ‘आयकर’ (Income Tax) वाचवता येतो.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

गुंतवणुकीचे पर्याय

पीपीएफ : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमधील (PPF) गुंतवणुकीवर 8 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये वार्षिक किमान 500 रुपये गुंतवू शकता. कोणतीही बँक वा पोस्टातही हे खाते उघडता येते. ‘आयकर’ कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्हाला ‘पीपीएफ’मध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते.

Advertisement

ईपीएफ : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) देखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. सेवानिवृत्तीनंतरही तुम्ही ‘ईपीएफ फंड’ काढू शकता. ‘ईपीएफ’मध्ये सलग 5 वर्षे गुंतवणूक केल्यास, तुम्ही ‘ईपीएफ फंड’ काढू शकता. त्यात गुंतवणूक, परतावा, मॅच्युरिटी करमुक्त आहेत.

सुकन्या समृद्धी योजना : केंद्र सरकारने मुलींसाठी ही अल्प बचत योजना सुरु केली आहे. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली होती. त्यात 8.5 टक्के व्याज मिळते. कर सवलतीसह, त्याचे उत्पन्न मॅच्युरिटीनंतर करमुक्त आहे.

Advertisement

एनपीएस (NPS) : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही सेवानिवृत्ती बचत योजना आहे. त्यात कलम 80C अंतर्गत वर्षाला 1.5 लाख आणि कलम 80CCD (1B) अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात. त्याचे उत्पन्न व मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त आहे.

या योजनांचाही लाभ

Advertisement

हाउसिंग रेंट अलाऊंस, लीव ट्रॅव्हल अलाऊंस, होम लोन व मुलांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजावर कर सवलत मिळते. कलम 80G अंतर्गत देणग्यांवर व कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरही कर लाभ उपलब्ध आहेत. गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाख रुपये सूट मर्यादा आहे.. शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर कर सूट मर्यादा मिळत नाही.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement