SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची बातमी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या पाठींब्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच दिल्ली दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी खातेवाटप बाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीची पूजा संपल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विचार करण्यात येईल. याबाबत लवकरच सांगण्यात येणार असून, अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Advertisement

मंत्रीमंडळात एकूण 43 मंत्र्यांपैकी शिंदे गटाने 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याची माहिती असून उर्वरीत 29 मंत्रिपदे भाजपने घ्यावीत, असे सूत्रांनी सांगतले आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत खरी शिवसेना कोणती? या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेनेच्या दोन तृतीयांश बहुमतासह जास्त आमदारांसह आम्ही नियमानुसार कारवाई केली. यावर येत्या 11 तारखेला म्हणजे उद्या निर्णय येईल. आमदारांच्या अपात्रतेविषयी सर्वोच्च न्यायालय योग्य निकाल देईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे शिंदे म्हणाले आहे.

Advertisement