SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अखेर इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्सची चिमणी सोडली!

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती व टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी शुक्रवारी उशीरा मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी 44 अब्ज डॉलर्सचा हा सर्वात मोठा करार रद्द केला आहे. ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी फेक अकाउंटची माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे आरोप मस्क यांनी ट्विटरवर केला आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर आता इलॉन मस्क यांच्यावर खटला दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.

इलॉन मस्क यांच्या वकिलांकडून असे सांगण्यात आले की, ट्विटरला अनेक विनंत्या करूनही बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देण्यात ते अयशस्वी झाले. यामुळे मस्क हा करार रद्द करत आहेत. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केल्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेतली आहे. ट्विटरने इलॉन मस्क यांना चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हा करार त्यावरच अवलंबून होता.

Advertisement

तर, ट्विटरच्या बोर्डाच्या वतीने बनावट खात्यांची खरी संख्या लपवून चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याने हा निर्णय घेतल्याचे खुद्द इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर इलॉन मस्क यांच्या वतीने यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला (SEC) असे सांगण्यात आले की, कराराच्या वेळी ट्विटरने करारामध्ये चुकीची माहिती दिली होती, ज्यामुळे 44 अब्ज डॉलरचा हा करार संपुष्टात येत आहे.

दरम्यान, टेस्ला प्रमुखांच्या टीमने शुक्रवारी पाठवलेल्या पत्रानुसार, मस्क हे दोन महिन्यांपासून जी माहिती ट्विटरकडे मागत होते ती माहिती ट्विटरने मस्क यांना दिली नाही म्हणून इलॉन मस्क यांनी हा करार रद्द केला आहे.

Advertisement