SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गौतम अदानी वाढवणार ‘जिओ’ आणि ‘एअरटेल’चं टेन्शन

देशभरात सध्या अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे नाव कमालीचे चर्चेत आहेत. अदानी पॉवर, अदानी गॅस आणि इतरही कंपन्या सध्या जोरदार नफ्यात आहेत. मागच्या महिन्यातच गौतम अदानी यांनी सिमेंट उद्योग क्षेत्रात जोरदार आगमन केलं आहे. गौतम अदानी यांनी सिमेंट उद्योग क्षेत्रातील दोन नामांकित कंपन्या टेक ओव्हर केल्या आहेत. आता गौतम अदानी लवकरच 5G मोबाईल सेवा क्षेत्रात पाऊल टाकण्यास सज्ज झाले आहेत. केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी देण्यात आल्यानंतर गौतम अदानी आणि अदानी उद्योग समूह या लिलाव प्रक्रियेत भाग घेणार आहे.

या महिन्याच्या अखेरीस 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी अदानी समूहाने अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अदानी समूहाने 8 जुलै रोजी लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. अदानी यांनी या लिलाव प्रक्रियेत भाग घेतल्याची चर्चा समोर आल्यानंतर आता जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढणार आहे. केंद्र सरकारच्या होणाऱ्या या लिलावामध्ये जिओ (Jio), भारती एअरटेल (Airtel), विआय (VI) अर्था व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपन्या आधीच शर्यतीत आहेत.

5G टेलिकॉम सेवा म्हणजेच अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यास सक्षम असलेल्या एअरवेव्हच्या लिलावासाठी 26 जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत देण्यात आली आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात 5G टेलिकॉम सेवा लाँच होणार आहे. 5G मोबाइल सेवेचा वेग आणि क्षमता 4G मोबाइल सेवेपेक्षा सुमारे 10 पटीने जास्त असणार आहे. केंद्र सरकारच्या स्पेक्ट्रम घेणार्‍या कंपनीला 10 वर्षांनंतर भविष्यातील कोणत्याही दायित्वाशिवाय स्पेक्ट्रम सरेंडर करण्याचा पर्याय दिला जाईल.

Advertisement