ठाकरे सरकारच्या काळात कार्यान्वित न झालेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरु केले आहे. सह्याद्री अतिथिगृहावर याबाबतची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वर्ल्ड बँकेचे अधिकारी उपस्थित असून बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प या सोबत अनेक प्रकल्पवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सोबतच जुन्या सरकारला त्यांच्या कार्यपद्धतीबाबत दोष द्यायचा नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपण मिळून सगळे जे प्रोजेक्ट जुने ते फास्ट ट्रॅकवर नेण्याचे ठरवले आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..:
2019 साली स्मार्ट प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी दहा हजार अॅग्री बिझनेस सोसायट्या तयार करून 19 लाख शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भात जागतिक बँकेने देखील 3000 कोटी दिले होते. मात्र, दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षांमध्ये केवळ 15 कोटी रुपयेच खर्च झाले. त्या प्रोजेक्टचे नाव सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असून, या प्रोजेक्टला आता पुन्हा गती मिळण्याकरीता आज बैठक झाली.
या व्यतिरिक्त जागतिक बँकेसोबत आणखी एक बैठक झाली असून, त्यात कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या पूरावर वळण बंधारे आणि कॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का यावर अभ्यास करण्यात आला होता. आजच्या बैठकीत आम्ही यावर पुन्हा चर्चा केली असून, जागतिक बँकेने मदत करण्याचे निर्देश दिले आहे