SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उद्धव ठाकरेंचा मोठा आदेश; शिवसैनिकांनो…

मुंबई : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता निवडणूक चिन्ह वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे नवीन निवडणूक चिन्ह मिळाल्यास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तयारी करण्याचे आवाहनदेखील ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

नेमके प्रकरण काय :-

Advertisement

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणले..:

Advertisement

दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना विनवणी केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली तर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. काही कारणास्तव दुरावलेल्या पक्षांनी एकत्र आले तर या राजकीय ताणाचा सुवर्णमध्य साधता येईल, असं आवाहन केसरकर यांनी केलंय. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हा योग्य निर्णय होईल, असंही केसरकर म्हणालेत. आता उद्धव ठाकरे हे शिंदे गटाच्या या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतील, हे पहावं लागणार आहे.

Advertisement