SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कार खरेदी करा अन् 3 महिन्यांनी पैसे द्या, ‘या’ कंपनीची जुलैपर्यंतच ऑफर..

भारतात गेल्या महिन्यात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपली विक्री वाढल्याचे सांगितले. स्कोडा, किआ कंपनी या वर्षात अधिक कार विक्री करणाऱ्या कंपनी ठरल्या. ते टाटा, मारुती सुझुकीने सुद्धा बाजारात जम बसवला. कंपन्या एकापेक्षा एक खास ऑफर्स देऊन, सवलत देऊन आपली विक्री वाढवत असतात.

स्कोडाने 2022 च्या पहिल्या 6 महिन्यांत 200% वार्षिक वाढ केली आहे. जानेवारी ते जूनपर्यंत भारतीय बाजारपेठेत 52,698 वाहनांची विक्री केली आहे. आता Skoda कंपनीने कंपनीने आपल्या लक्झरी SUV Skoda Kushaq साठी एक जबरदस्त ऑफर काढली आहे. कारण भारतात मागील 6 महिन्यांत सर्वाधिक विक्री नोंदवली करणाऱ्या स्कोडाला आणखी जबरदस्त विक्री करायची आहे. यासाठी कंपनीने आधी कार खरेदी करा, नंतर पैसे द्या, (Buy Now, Pay Later Offer Skoda) ऑफर आणली आहे.

Advertisement

ग्राहक आता Skoda Kushaq ही SUV खरेदी करून SUV खरेदी केल्यानंतर 3 महिन्यांनंतर पेमेंट करावे लागेल. म्हणजेच आता फक्त जुलै 2022 पर्यंत ही ऑफर आहे. तर ऑक्टोबरपासून ग्राहकांना ईएमआयद्वारे गाडीचे पैसे भरावे लागणार आहेत. स्कोडाला भारतीय बाजारपेठेत आपल्या एसयूव्ही कुशकची मुळे मजबूत करायची आहेत. म्हणून कंपनी ग्राहकांना कार दिल्यानंतर 3 महिन्यांनंतर सुलभ ईएमआयमध्ये (EMI) पेमेंटचा पर्याय देईल. म्हणजेच ही SUV खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे अजून बजेट नाही, तरीही तुम्ही ती खरेदी करू शकता.

आता महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फायनान्स कंपनी किंवा बँकेने दिलेले सर्व निकष पूर्ण करावे लागतील. एवढेच नाही तर ही ऑफर कंपनीच्या स्टॉकवरही अवलंबून असेल. या ऑफरमध्ये कोणत्याही ॲक्सेसरीजचा समावेश नाही. म्हणजेच, तुम्हाला जागेवरच ॲक्सेसरीजसाठी पैसे द्यावे लागतील. ऑफरशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी ग्राहक स्कोडा डीलरशीपशी संपर्क साधू शकतात.

Advertisement

स्कोडा कुशकचे आकर्षक फीचर्स:

हे दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. पहिले 1.0-लिटर तीन-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन आहे, जे 115 bhp पॉवर आणि 175 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले आहेत. 1.5-लीटर TSI टर्बो पेट्रोल इंजिन, जे 150 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 7 स्पीड DSG गिअरबॉक्ससोबत 6 स्पीड मॅन्युअलशी जोडले आहेत.

Advertisement

स्कोडा कुशकमध्ये एक प्रतिष्ठित मोठी फ्रंट ग्रिल आहे. कारमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प आणि एलईडी टेल लाइट्स आहेत. कारच्या पुढील भागात एक मोठा एअर डॅम आणि सरळ बोनेट देण्यात आला आहे.

या एसयूव्हीमध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटो-डिमिंग हेडलॅम्प, ॲम्बियंट केबिन लाइटिंग, 10-इंच टचस्क्रीन, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सिस्टम, सबवूफरसह स्कोडा 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, इलेक्ट्रो-ऑपरेट आणि ऑटो-फोल्डिंग ओआरव्हीएम, इलेक्ट्रिक सनरूफ उपलब्ध असणार आहेत.

Advertisement

या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर्स, आयसोफिक्स सीट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटोमॅटिक हेडलाइट, रियर पार्किंग कॅमेरा आणि मल्टी-कॉलिजन ब्रेक, EBD सह ABS आहे. Skoda Kushaq ची किंमत रु. 11.29 लाख ते रु. 19.49 लाख एक्स-शोरूम आहे, अशी माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement