भारताने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात इंग्लंडशी पहिला टी-20 सामना जिंकला आहे.भारताने काल (ता. 7 जुलै) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता भक्कम धावसंख्या उभारली होती. टी-20 मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंविरुद्ध 50 धावांनी विजय (Ind vs Eng 1st T-20) झाला आहे.
भारतानं इंग्लंडसमोर 20 षटकात 8 विकेट्स गमावून 199 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्यु्त्तरात इंग्लंडच्या संघाला 148 धावापर्यंत मजल मारता आली. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताची फलंदाजी: साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये भारताची प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवात झाली. रोहित शर्माने 14 चेंडूत 24 धावा, ईशान किशनने 10 चेंडूत 8 धावा, दीपक हुड्डाने 17 चेंडूत 33 तर सुर्यकुमार यादवने 19 चेंडूत 39 धावांची वादळी खेळी केली. सतराव्या षटकात अक्षर पटेलच्या रुपात भारताला पाचवा धक्का लागला. मग हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत 33 चेंडूत 51 धावा केल्या. दिनेश कार्तिकने 11 धावा केल्या तर भुवनेश्वर कुमार नाबाद 1 आणि अर्शदीप सिंहने नाबाद 2 धावा केल्या.
इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनला प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या. तर, रीस टोपले, मॅथ्यू पार्किन्सन आणि टायमल मिल्स यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
इंग्लंडची फलंदाजी: भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात जोस बटलरला शून्यावर आउट केलं. मोईन अलीने सर्वाधिक 36 धावा केल्या. जेसन रॉय (4 धावा), डेव्हिड मालन (21 धावा), लियाम लिव्हिंगस्टोन (0 धावा), हॅरी ब्रूक (28 धावा), मोईन अली (36 धावा), सॅम करण (4 धावा), ख्रिस जॉर्डन (26 धावा), टी. मिल्स (7 धावा), आर. टोप्ले (9 धावा), मॅथ्यू पार्किनसन्स (0 धावा) हे झटपट बाद झाले.
इंग्लंडचा संघ 20 षटकात 148 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून हार्दिक पंड्यानने 4 विकेट्स, युजवेंद्र चहल-अर्शदीप सिंहने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलला एक विकेट मिळाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy