SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मृत व्यक्तीच्या ‘आधार कार्ड’चा गैरवापर होऊ शकतो.. तातडीने करा ‘हे’ काम..!!

‘आधार कार्ड’.. सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक.. शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असो, बँकेत खातं उघडायचे असो, कर्ज काढण्यासाठी, ओळखीचा पुरावा म्हणून, तसेच सरकारी वा निमसरकारी योजनांसाठी आधार कार्डची मागणी केली जाते..

‘आधार कार्ड’मध्ये ‘बायोमेट्रिक’ व ‘डेमोग्राफिक’ माहिती असते. ही माहिती सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याचे आधार कार्ड तातडीने ‘ब्लाॅक’ करायला हवं.. अन्यथा, मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असते. मृत व्यक्तीचं आधार कार्ड कसं ‘ब्लॉक’ करायचं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

असं करा आधार कार्ड ब्लाॅक..

  • मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये, यासाठी आधार कार्ड ‘ब्लॉक’ करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ‘युआयडीएआय'(UIDAI)च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
  • ‘माय आधार’ (My Aadhaar Card) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला आधार कार्ड ‘लॉक किंवा ‘अनलॉक’ पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तेथे मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड टाकावा लागेल…
  • नंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ‘वन टाईम पासवर्ड’ (OTP) येईल. हा ओटीपी टाकताच आधार कार्ड ब्लॉक केलं जाईल. त्यानंतर त्याचा चुकीच्या कामासाठी कोणीही वापर करू शकणार नाही..

पॅन कार्डचे काय करायचे..?

Advertisement

कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे निधन झाल्यास, शक्य तितक्या लवकर त्या व्यक्तीचे पॅन कार्ड ‘डिएक्टिव्हेट’ करणं आवश्यक आहे.. त्यासाठी तुम्ही आयकर विभागाशी (IT Dept) संपर्क साधू शकता. खाते निष्क्रिय करण्यापूर्वी दुसऱ्याच्या नावावर ते हस्तांतरित करा. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ते ‘डिएक्टिव्हेट’ करू शकता…

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement