SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, ‘या’ ठिकाणी उडणार राजकीय धुरळा..!!

राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी आहे.. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. राज्य निवडणूक आयोगाने आज (ता. 8) या निवडणुकांच्या घोषणा केली. पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे..

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान व दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे…. मात्र, ‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाचा तिढा कायम असून, या निवडणुका ‘ओबीसी’ आरक्षणाशिवायच होणार असल्याचे बोलले जाते. निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेल्या ठिकाणी आजपासूनच (ता. 8) आचारसंहिता लागू झाली आहे..

Advertisement

निवडणुकीचे वेळापत्रक

  • 20 जुलै – जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
  • 22 ते 28 जुलै – संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरणे
  • 29 जुलै – छाननी व वैध नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार
  • 4 ऑगस्ट – अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार.
  • 18 ऑगस्ट – मतदान
  • 19 ऑगस्ट – मतमोजणी

या नगरपालिकांच्या निवडणुका

Advertisement

‘अ’ वर्ग 

  • भुसावळ (जि. जळगाव), बारामती (जि. पुणे), बार्शी (जि. सोलापूर), जालना (जि. जालना), बीड (जि. बीड), उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

‘ब’ वर्ग

Advertisement
  • नाशिक – मनमाड, सिन्नर, येवला
  • धुळे – दोंडाईचा-वरवाडे, शिरपूर-वरवाडे
  • नंदुरबार – शहादा
  • जळगाव- अमळनेर, चाळीसगाव
  • अहमदनगर- संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर
  • पुणे – चाकण, दौंड
  • सातारा – कराड, फलटण
  • सांगली – इस्लामपूर, विटा
  • सोलापूर – अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज (नवनिर्मित)
  • कोल्हापूर – जयसिंगपूर
  • औरंगाबाद – कन्नड, पैठण
  • बीड – अंबेजोगई, माजलगाव, परळी-वैजनाथ
  • लातूर – अहमदपूर
  • अमरावती – अंजनगाव-सुर्जी

‘क’ वर्ग

  • नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
  • जळगाव – वरणगाव, धरणगाव,  एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल
  • अहमदनगर – जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहाता, राहुरी
  • पुणे – राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर
  • सातारा – म्हसवड, रहिमतपूर, वाई
  • सांगली – आष्टा, तासगाव, पलूस
  • सोलापूर – मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मेंदगी, मंगळवेढा, सांगोला
  • कोल्हापूर – गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव
  • औरंगाबाद – गंगापूर, खुलताबाद
  • जालना – अंबड, भोकरदन, परतूर
  • बीड – गेवराई, किल्ले धारुर
  • उस्मानाबाद – भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर
  • लातूर – औसा, निलंगा
  • अमरावती – दर्यापूर
  • बुलडाणा – देऊळगाव राजा

4 नगरपंचायती

Advertisement
  • अहमदनगर – नेवासे
  • पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित)
  • पुणे/बारामती – माळेगाव बुद्रुक (नवनिर्वाचित)
  • सोलापूर/मोहोळ – अनगर

‘ओबीसी’ आरक्षणाचे काय..?

‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या.. अखेर हा मुद्दा सुप्रिम कोर्टात गेला.. पावसामुळे जे जिल्हे प्रभावित होणार नाहीत, अशा ठिकाणी प्रत्यक्ष निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने 17 मे 2022 रोजी दिला होता.

Advertisement

सुप्रिम कोर्टाच्या या आदेशानुसार भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम असताना, निवडणुका जाहीर करण्यात आल्या.. त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement