SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हूशश..!! सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी

मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीपाठोपाठ सामान्यांना महागाईचा दुहेरी झटका बसत होता. मात्र आता इंधन दरवाढीने नागरिक हैराण झालेले असताना खाद्यतेल आणि डाळींचे भाव कमी झाले आहे. यामुळे सर्वसामान्य जनेतला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आजपासून किरकोळ बाजारात खाद्यान्न वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागले असून आठवडाभरात खाद्य तेल, डाळी आणि टोमॅटोच्या किंमती घट झाल्याचे दिसून आले आहे.

केंद्र सरकारने आताच खाद्य वस्तूंच्या किंमतींची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार आठवडाभरात खाद्य तेल, टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घसरण झाल्याचा दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने केला आहे.

Advertisement

अन्न आणि नागरी मंत्रालयाच्या आकडेवारनुसार :
7 जून 2022 रोजी मोहरीच्या तेलाचा सरासरी भाव 182.40 रुपये होता. 7 जुलै रोजी तो 178.01 रुपये इतका खाली आला आहे. त्याशिवाय सोयाबीन तेलाच्या भावात 2.29 टक्के घसरण झाली. वनस्पतीचा भाव 1.93 टक्के आणि सूर्यफूल तेलाचा भाव 3.93 टक्क्यांनी कमी झाला आहे. पाम तेलाच्या किरकोळ विक्रीत सरासरी 7.84 टक्के घसरण झाली आहे.

याशिवाय टोमॅटोचा भाव 17.73 टक्क्यांनी कमी झाला असून गेल्या महिन्यात टोमॅटोने 100 रुपयांचा आकडा पार केला आहे. तर टोमॅटो स्वस्त झाले असले तरी कांदे आणि बटाटे यांच्या किंमतीत सरासरी 8 टक्क्यांची वाढ झाली. विविध प्रकारच्या डाळींच्या किंमतीत देखील महिनाभरात घसरण झाल्याचे सरकारने म्हटलं आहे.

Advertisement