SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गव्हानंतर आता ‘या’ दोन खाद्यांवर बंदी; भारताचा निर्यातीबाबत मोठा निर्णय

नवी दिल्ली :

रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जागतिक पातळीवर हाहाकार माजला आहे. भारताने रशिया-युक्रेन युद्धानंतर सुरुवातीच्या काळात साखर निर्यातीवर निर्बंध लावले होते. साखरेनंतर मग गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लावले गेले आणि आता त्यापाठोपाठ पिठाच्या निर्यातीवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यंत कडक असे निर्बंध भारताकडून सध्या लावण्यात येत आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आगामी काळामध्ये पिठाच्या निर्यातीसाठी Inter-Ministrial Committee ची परवानगी आवश्यक असणार आहे.

Advertisement

पिठाच्या बाबतीत घेतलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचना 12 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहे. DGFT ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गव्हाच्या निर्यातीसाठी तयार करण्यात आलेल्या Inter-Ministrial Committeeने दिलेल्या मंजुरीनंतर पिठाची निर्यात करण्यास परवानगी देण्यात येईल.

DGFT च्या नव्या नोटिफिकेशनुसार पिठ, मैदा, रवा, होलमील पिठ, रिजलटेंट पिठा या सर्वांच्या निर्यातीसाठी मनाई करण्यात आली आहे. गव्हाच्या पिठाच्या दर्जानुसार वेगवेगळे निर्णय घेण्यात येणार आहेत. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किंमतीमध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

या वाढीमुळेच केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर मे महिन्यात बंदी घातली होती. आता गव्हापाठोपाठ पीठ आणि मैद्यावरही निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. गव्हाच्या वाढलेल्या किंमतीमुळे किरकोळ बाजारात पिठाचे दर गगनाला भिडले आहेत. मागील वर्षभरात पिठाच्या दरात 13 ते 15 टक्क्यांची दरवाढ झाली आहे. याआधी केंद्र सरकारने गव्हाच्या उत्पादनात घट आणि गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर देशाच्या खाद्यान्न सुरक्षेच्या कारणास्तव गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालायचा निर्णय घेतला होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आणि त्याचे परिणाम आता हळू-हळू दिसायला लागले आहेत.

Advertisement