आजकाल थेटरमध्ये जाऊन चित्रपट बघणारे प्रेक्षक कमी झाले आहेत. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम यांसारखे इतरही काही ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या लोकप्रिय झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म हे काहीसे महाग असले तरीदेखील सब्स्क्रिप्शन घेऊन हे Apps वापरणाऱ्यांची संख्या कमालीची आहे. विशेषकरून नेटफ्लिक्सचा चाहता वर्ग मोठा आहे. नेटफ्लिक्स इतर ओटीटी प्लॅटफॉर्म पेक्षा काहीसे महाग आहे. असं असल तरी हे नेटफ्लिक्स अनेक Airtel आणि Vodafone-idea (Vi) प्लानसह विनामूल्य येते. सध्याची लोकप्रिय कंपनी जिओ पोस्टपेड प्लॅन डिस्ने +हॉटस्टार आणि अमेझॉन प्राइम सारख्या इतर OTT प्लानचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. या पोस्टपेड प्लॅनची किंमत 399रुपये , 599रुपये , 799रुपये , 999रुपये , 1499 रुपये अशी आहे.
1499 रुपये किंमत असणाऱ्या जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये 300 GB डेटा, डेटा मर्यादा संपल्यानंतर 10/GB रुपये, प्लॅनमध्ये 500GB पर्यंतचा रोलओव्हर डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉल्स, डेली 100sms, मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि Amazon Prime सदस्यत्व या सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे.
999रुपये किंमत असणाऱ्या जिओ पोस्टपेडमध्ये 200GB डेटा, डेटा मर्यादा संपल्यानंतर 10/GB रुपये, अनलिमिटेड व्हाईस कॉल्स, डेली 100sms, मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि Amazon Prime सदस्यत्व या सर्व गोष्टींचा समावेश आहे. 799रुपये किंमत असणाऱ्या जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 150GB डेटा, डेटा मर्यादा संपल्यानंतर 10/GB रुपये, अनलिमिटेड व्हाईस कॉल्स, डेली 100sms, मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि Amazon Prime सदस्यत्व अशा सर्व गोष्टी ऑफर करतो.
499 रुपयांचा जिओ पोस्टपेड प्लॅन 100GBडेटा, 200GB पर्यंतचा रोलओव्हर डेटा, मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि Amazon Prime सदस्यत्व या सर्व गोष्टी ऑफर करतो. 399रुपये किंमत असणारा जीओचा पोस्टपेड प्लॅन 75GB डेटा, डेटा मर्यादा संपल्यानंतर 10/GB रुपये, अनलिमिटेड व्हाईस कॉल्स, डेली 100sms, मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि Amazon Prime सदस्यत्व या गोष्टी ऑफर करतो.