इंग्लंडविरुद्ध आज (ता. 7 जुलै) गुरुवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात (IND vs ENG T-20) भारताचा कर्णधार बदलणार आहे, त्यामुळे या सामन्यात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. रविवारी रोहित शर्माची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपला असून तो आज होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यामध्ये खेळणे अपेक्षित आहे.
भारतीय संघात आज मोठे बदल होण्याची शक्यता:
मधली फळी: भारताची ट्वेन्टी-20 सामन्यांतील मधली फळी ही जवळपास पक्की झाली आहे. वारंवार संघात होणाऱ्या बदलामुळे टीममध्ये आणि मधल्या फळीला लय सापडत नव्हता पण आता दीपक हुडा, दिनेश कार्तिक व हार्दिक पंड्या यांचे स्थान आजच्या सामन्यात मधल्या फळीत निश्चितच असल्यासारखं आहे.
अष्टपैलू: भारतासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करणारे अक्षर पटेल आणि वेंकटेश अय्यर यांना किंवा यांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. वेंकटेश अय्यरने मागील काही सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्याने अक्षर पटेलचे स्थान मजबूत मानले जात आहे. अक्षर पटेल दमदार गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजीदेखील करू शकतो.
इशान किशन की संजू सॅमसन: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यामध्ये धडाकेबाज फलंदाज इशान किशन आणि हिटर संजू सॅमसन यांच्यामध्ये चुरस असणार आहे. कारण रोहित शर्मा संघात परतत असल्याने या दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. त्यामुळे कदाचित संजूला या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते.
फिरकीपटूंमध्ये चुरस: भारतीय संघात फिरकीपटूंची संख्या आता वाढत आहे. आयपीएल गाजवणाऱ्या रवी बिश्नोईला मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखले जाते. त्याची गोलंदाजी फलंदाजांना सहसा समजत नाही, असे रोहितचे म्हणणे आहे. पण दुसरीकडे अनुभवी आणि चतुर असणारा युजवेंद्र चहलसारखा अनुभवी फिरकीपटू आहे. यामुळे एक फिरकीपटू घेण्याचं ठरल्यास भारताच्या संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे.
वेगवान गोलंदाजांमध्येही स्पर्धा: भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्येही उमरान मलिक, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार या तिघांना स्थान देण्यात आले होते. हर्षल पटेलला यंदा विश्रांती देऊ शकतात. वेटिंगवर असलेला युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला हर्षल पटेलऐवजी संघात आज स्थान मिळू शकते.
सामना रात्री 10.30 वा. सोनी सिक्स, सोनी टेन-3 वर तुम्ही पाहू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy