SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगापुढे आता नवे संकट : ‘इतके’ अब्ज लोक उपासमारीच्या खाईत!!

जगभरात गेल्या दोन ते तीन वर्षापासूनच उपासमारीची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुमारे 2.3 अब्ज लोकांना अन्न मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला रशिया- युक्रेन युद्धामुळे धान्य, खतं आणि उर्जेची किंमत वाढली आहे. आता संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे.

अहवाल प्रकाशित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाच संस्थांच्या प्रमुखांनी सांगितलं की, 2021 च्या आकडेवारीवर आधारित जगातील अन्न सुरक्षा आणि पोषणाची स्थिती भयानक आहे. भूक, अन्न असुरक्षितता आणि कुपोषण संपवण्याच्या प्रयत्नात जग मागे पडल्याची शंका व्यक्त केली आहे. अहवालानुसार, जगभरात सकस व निरोगी आहार घेऊ शकत नसलेल्या लोकांची संख्या 112 दशलक्षाने वाढून ती सुमारे 3.1 अब्ज झाली आहे.

Advertisement

युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. धान्य, खत आणि उर्जेच्या किंमतींवर त्याचा परिणाम होत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे 2022 च्या पहिल्या सहामाहीत किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

अहवालानुसार, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशात 2021 मध्ये उपासमारीची स्थिती वाढली आहे. 2021 मध्ये आफ्रिकेतील 278 दशलक्ष, आशियातील 425 दशलक्ष आणि लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमधील 5.65 अब्ज लोकांची उपासमार झाली आहे.

Advertisement

दरम्यान, जगातील बहुतांश गरीब देशांमध्ये सध्या बिकट परिस्थिती असून, डब्ल्यूएफपीचे म्हणणे असे आहे की, जगातील विकसित आणि समृद्ध देशांनी या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर या संकटाचा परिणाम त्याही देशांवर होईल.

Advertisement