SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘एसी’ला आला स्मार्ट पर्याय; ‘हा’ एसी चालणार विजेशिवाय

गुवाहाटी :

देशभरात तंत्रज्ञानावर आणि संशोधनावर मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. असाच एक अनोखा शोध गुवाहाटीतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मधील संशोधकांनी लावला आहे. वातानुकूलित यंत्राला(AC) पर्याय ठरू शकेल,अशा रेडिएटिव्ह कुलर कोटिंग मटेरिअलचा आराखडा तयार करण्याचे काम या संशोधकांनी केले आहे. या रेडिएटिव्ह कुलर कोटिंग मटेरिअल वैशिष्ट्य म्हणजे याला चालवण्यासाठी विजेची गरज लागणार नाही. संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे मटेरिअल म्हणजे विद्युतमुक्त शीतप्रणाली आहे.

Advertisement

याचा वापर छतावर देखील करता येतो. याचा वापर दिवसा आणि रात्री प्रभावीपणे करणे शक्य आहे. या रेडिएटिव्ह कुलर कोटिंग मटेरिअलमध्ये पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलिंग प्रणालीचा उपयोग करण्यात आला आहे. याद्वारे सभोवतालच्या वातावरणातील उष्मा इन्फ्रारेड रेडिएशनच्या माध्यमातून शोषून घेते आणि त्यानंतर त्याच उष्म्याचे उत्सर्जन देखील केले जाते. यामुळेच ज्या ठिकाणी ही प्रणाली बसवण्यात आली आहे ती जागा पूर्णपणे थंड होण्यास मदत होते. सर्वाधिक पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलर हे फक्त रात्रीच वापरता येतं. दिवसामात्र या कुलरला काम करण्यासाठी सगळ्या सौर किरणांना परावर्तित करावे लागते.

आयआयटी गुवाहाटीमधील संशोधक आशिषकुमार चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत कुलिंग प्रणाली बाबत जे प्रयोग करण्यात आले होते ते काहीसे असफल झाले होते. काही कुलिंग प्रणाली थंडावा निर्माण करण्यास असमर्थ होत्या.

Advertisement

हीच समस्या ध्यानात घेऊन परवडणारी आणि अधिक प्रभावी अशी प्रणाली आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी तयार केली असून ही प्रणाली 24 तास काम करू शकते. ‘जर्नल ऑफ फिजिक्स डी ः अप्लाईड फिजिक्स’ या मॅगझिनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Advertisement