SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ सोप्या ट्रिकने ओळखा गॅस सिलेंडर कधी संपू शकतो ती तारीख!

गॅस सिलेंडर संपणे ही एक मोठी समस्या आहे. त्यातही तो वेळेआधी संपला किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा टाकी नसेल तर मात्र खूप गोंधळ उडू शकतो. कोविड काळात कोणाला मदत मागायची किंवा कोणाकडून गोष्टी आणायची सुद्धा सोय राहिलेली नाही. अशा वेळी तारांबळ टाळायची म्हणून आपण काय करायला हवे?

कोणी म्हणेल आधीच खबरदारीपूर्वक लक्ष द्यायला हवे. मात्र, तसे नाही करता आले तर काय? सिलेंडर हलवून पाहताना सुद्धा कित्येक वेळा आपल्याला अंदाज येणे कठीण असते. त्यासाठी एक सोपा उपाय आज आपण जाणून घेऊयात.

Advertisement

कापड पाण्यामध्ये बुडवून पिळून घ्या. आता हे ओलं झालेलं कापड सिलेंडरवर गुंडाळा थोड्यावेळाने कापड बाजूला करा. सिलेंडर टाकीवर पाण्याचे ठसे उमटलेले असतील. या ठशांचं व्यवस्थित निरीक्षण करा. ज्या भागामध्ये ओलसरपणा राहिलेला आहे, तेवढा भाग सिलेंडर भरलेला आहे असं समजावं. गॅस नसलेला भाग कोरडा असेल कारण, ज्या भागामध्ये गॅस असतो त्या भागामध्ये थंडावा असतो तर, गॅस संपलेल्या भागामध्ये उष्णता निर्माण झालेली असते.

ही सोपी ट्रिक दर महिन्याला वापरून सिलेंडर संपल्यानंतर होणाऱ्या त्रासापासून वाचू शकता.

Advertisement