SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदी झालं स्वस्त! खरेदीची योग्य संधी, वाचा आजचे ताजे दर..

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे काल शेअर बाजारात तेजी दिसली तर आज सोन्या-चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या मागील काही दिवसांत सोन्याच्या भावात चढ-उतार दिसून येतोय. या यंदा महागाईने डोके चांगलेच वर काढलेले दिसत आहे.

सध्या तरी आठवड्याच्या सुरुवातीस सोमवारी आणि मंगळवारी बाजारात स्थिरता दिसून आली मात्र काल (ता.6 जुलै) सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. यानंतर आज पुन्हा सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार आज खरेदीसाठी उत्साह दाखवणार आहेत.

Advertisement

गुड रिटर्न्स या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये असून तुमच्या शहरांत आणि या दरात किंचित फरक असू शकतो. आज चांदीचे भाव घसरून ते 10 ग्रॅम चांदीसाठी दर 569 रुपयांवर आले आहेत. (Todays Gold, Silver price Updates)

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव:

Advertisement

▪️मुंबई – 51,980 रुपये
▪️नागपूर -52,980 रुपये
▪️पुणे -52,480 रुपये
▪️चेन्नई – 51,710 रुपये
▪️दिल्ली – 51,930 रुपये
▪️हैदराबाद – 51,930 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,930 रुपये
▪️लखनऊ – 52,080 रुपये

हॉलमार्क (Hallmark)-

Advertisement

जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही सर्वात आधी त्याची गुणवत्ता तपासायला हवी. ज्वेलर्सकडे गेल्यावर तुम्ही हॉलमार्क चिन्ह पाहिलं की खरेदी करावी. लक्षात घ्या की, सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement