SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ट्रॅफिकचे ‘हे’ वेगळे नियम माहिती आहेत का..? होऊ शकते कारवाई…

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोदी सरकारने वाहतूक नियम अधिक कडक बनवले आहेत. नागरिकांच्या काळजीपोटीच हे नियम बनवले आहेत. असे असले, तरी वाहतूक पोलिस कारवाई करायला लागल्यावर नागरिकांकडूनच त्याला विरोध होतो..

वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम केले असले, तरी अनेकांना त्याची माहिती नसते.. काही नियम हे शहरांनुसार, राज्यांनुसार बदलतात. अशाच काही वाहतूक नियमांबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

पार्किंगमधला रस्ता ब्लॉक केल्यास…
बरेच जण पार्किंग एरियामध्ये गाडी उभी करुन कामासाठी जाता.. परत आल्यावर दुसऱ्या एखाद्या वाहनामुळे तुमची गाडी बाहेर काढता येत नाही.. अनेक चालक कुठंही वाहन उभं करून निघून जातात, परंतु तुमची ही कृती वाहतूक नियमाविरुद्ध आहे. वाहतूक पोलिस अशा चालकाकडून दंड वसूल करू शकतात.

कारमध्ये सिगारेट ओढणे
कारमध्ये बसून सिगारेट ओढत असाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. खरं तर हा नियम केवळ दिल्ली एनसीआरपुरता मर्यादित आहे. परंतु, या नियमामुळे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांना आळा बसू शकतो.

Advertisement

दुसऱ्याची गाडी चालवणे
अनेकांना दुसऱ्याची गाडी मागण्याची खोड असते. मात्र, असं करणं गुन्हा आहे. तुम्ही दुसऱ्याची गाडी चालवताना पकडले गेल्यास नि गाडी मालकाने तुम्हाला गाडी चालवण्यास दिली नव्हती, असे सांगितल्यास, तुमच्यावर बाइक चोरीच्या आरोपाअंतर्गत कारवाई होऊ शकते.

रस्त्यावर कार सोडल्यास..
चालू कार रस्त्यात तशीच सोडून गेल्यास, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमच्या वाहनामुळे वाहतुकीस अडथळा झाल्यास चालान कापलं जातं. ट्रॅफिक सिग्लनवर वाहन सोडून दिल्यास, मोठी कारवाई होते. कारचं इंजिन बराच वेळ सुरू ठेवल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. इंधन बचतीसाठी हा नियम केला आहे.

Advertisement

कारमध्ये टिव्ही पाहणे..
ट्रॅफिक सिग्नलवर बराच वेळ कार उभी करुन आत टीव्ही पाहू शकत नाही. तुम्ही केवळ गाडी पार्क करताना, कारमध्ये दिलेला कॅमेरा ऑन करून हा टीव्ही ऑन करू शकता.

मुंबईत डबल हेल्मेट सक्ती
मुंबईत दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोन्ही प्रवाशांना हेल्मेट बंधनकारक केलं आहे. इतर शहरांत केवळ दुचाकीचालकालाच हेल्मेट अनिवार्य आहे. मुंबईत या निर्णयाला विरोध होतोय, मात्र वाहतूक विभाग त्यांच्या नियमांवर ठाम आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement