SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वाहनधारकांच्या फायद्याची बातमी, ‘इन्शुरन्स’च्या नियमांत मोठे बदल..!!

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.. लाख मोलाचे वाहन घेताना, प्रत्येक जण दहा वेळा विचार करतो.. मात्र, वाहनाच्या विम्याबाबत (इन्शुरन्स) फारसं तितके गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अनेकदा प्रीमियम जास्त पडतो, म्हणून काही जण ‘इन्शुरन्स’चे नूतनीकरण करण्यासही चालढकल करताना दिसतात.

वाहनांच्या इन्शुरन्सबाबत आता काळजी करु नका.. ‘आयआरडीएआय’ने (Insurance Regulatory and Development Authority of India) ‘इन्शूरन्स’च्या नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे गाडीच्या ‘इन्शूरन्स’मध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. इन्शुरन्समधील या बदलाबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

वाहनांच्या इन्शुरन्समध्ये बदल…

ड्रायव्हिंग कौशल्यावर प्रीमिअम

Advertisement

‘आयआरडीएआय’च्या नव्या नियमानुसार, तुमच्या ‘ड्रायव्हिंग कौशल्या’वर (स्किल) तुमच्या कारचा ‘इन्शूरन्स प्रीमिअम’ ठरणार आहे. थोडक्यात तुम्ही गाडी कशी चालवता, सर्व नियमांचे पालन करता का, रस्त्यावरील इतर वाहनांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षितपणे गाडी चालवता का? या सर्व बाबींची नोंद ठेवण्यात येणार आहे.

तुमचं ड्रायव्हिंग सर्व निकषांत बसत असल्यास कारचा ‘इन्शूरन्स प्रीमिअम’ कमी भरावा लागेल. मात्र, ‘रॅश ड्रायव्हिंग’ करीत असल्यास, तुम्हाला जास्त प्रीमिअम भरावा लागेल. त्यामुळे ‘सेफ ड्रायव्हिंग’ केल्यास तुम्ही सुरक्षित राहालच, पण तुमच्या खिशालाही झळ बसणार नाही..

Advertisement

वाहने अनेक-विमा एक

तुमच्या घरात एकापेक्षा जास्त वाहने असली, तरी एकाच ‘इन्शूरन्स’मध्ये सगळी वाहने कव्हर करता येणार आहेत. कार असो वा मोटरसायकल, प्रत्येक वाहनासाठी आता वेगळ्या ‘इन्शूरन्स’ काढण्याची गरज लागणार नाही.

Advertisement

गाडीच्या प्रवासानुसार प्रीमियम

एका वर्षात तुम्ही किती किलोमीटर गाडी चालवता, याचा प्रभावही ‘इन्शूरन्स पॉलिसी’वर पडू शकेल. तुम्ही जितकी गाडी चालवाल, ‘इन्शूरन्स’चा ‘प्रीमिअम’ही त्या प्रमाणात भरावा लागेल. कार इन्शूरन्सच्या नियमातील हे नवे बदल तात्काळ लागू केले जाणार आहेत. ‘इन्शूरन्स’ कंपन्यांनीही याबाबत योग्य ती पावले उचलण्यास सुरूवात केली आहे..

Advertisement

कारमध्ये जीपीएस डिव्हाईस

‘आयआरडीएआय’च्या नव्या नियमानुसार, कारमध्ये ‘जीपीएस’ डिव्हाईस लावण्यात येतील. हे डिव्हाईस तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याबाबत माहिती गोळा करतील, तसेच तुमचा ड्रायव्हिंग स्कोअरचा रेकॉर्ड ठेवला जाईल. कारचा इन्शूरन्स काढताना, इन्शूरन्स कंपन्या तुमचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड चेक करतील व त्यानुसार तुमच्या कारचा प्रीमियम ठरवला जाणार आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement