SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Amazonचा खास सेल; 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटवर मिळणार ‘या’ वस्तू

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon जगातील सर्वात लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे. Amazon आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच विविध प्रकारचे सेल आणत असतो. आता Amazon वर लवकरच Prime Days सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन्सला आकर्षक किंमतीत खरेदी करता येणार आहेत. केवळ स्मार्टफोनच नाही तर सेलमध्ये तुम्हाला इतर वस्तूंवर देखील आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ICICI Bank आणि SBI कार्ड्सने पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

Prime Days सेलमध्ये मोबाइल आणि एक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. लॅपटॉप, हेडफोन आणि इतर प्रोडक्ट्सवर 75 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. किचन अ‍ॅप्लायंसवर 70टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. किचन अ‍ॅप्लायंस खरेदी करत असताना ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयचा देखील पर्याय उपलब्ध होणार आहे.

Advertisement

होम डेकोरवर ग्राहकांना 70 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे तर 99 रुपये किंमतीत कूकवेयर आणि डायनिक व फर्निचरवर 80 टक्क्यापर्यंत बंपर डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही जर नवीन टीव्ही अथवा रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Prime Days सेल तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.

नवीन टीव्ही अथवा रेफ्रिजरेटर खरेदीवर 50 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहक वॉशिंग मशीन अवघ्या 6,999 रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. Amazon ब्रँड्सच्या स्वतःचा प्रोडक्ट्सवर 70 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. Amazon Prime Days Sale दोन दिवसांसाठी असणार आहे. 23, 24 जुलै रोजी हा सेल असणार आहे आणि 24 जुलैला रात्री हा सेल संपणार आहे.

Advertisement