SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयकर वाचवण्यासाठी आता पत्नी देणार साथ; काय आहेत सोप्या टिप्स जाणून घ्या!

पती-पत्नीचे नाते हे एका अतूट विश्वासावर आणि भक्कम साथीवर अवलंबून असते. ही साथ सुख-दुःखात, आयुष्याच्या चढ-उतारात, सगळीकडे लाभली की आयुष्य सुखकारक होऊन जातं. पत्नीला अर्धांगीनी संबोधले जाते. आता हीच पत्नी आयकर वाचवण्यासाठी देखील भक्कम साथ देऊ शकते, अशा काही सोप्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत!

गृहकर्ज

तुम्ही घर घेण्यासाठी जेव्हा गृहकर्ज घेता तेव्हा लागणारा टॅक्स किंवा आयकर हा भरमसाठ असतो. मात्र, जर तुम्ही पत्नीसोबत जॉइंट अकाउंट द्वारे गृहकर्जाचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर; तुम्ही आयकर वाचवण्याच्या योग्य मार्गावर आहात.

कलम 80सी अंतर्गत पती-पत्नी दोघांनाही प्रत्येकी 1.5-1.5 लाख रुपयांची करात सवलत मिळेल. त्यासोबतच सेक्शन 24 (बी) अंतर्गत दोघांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची कर सवलत मिळू शकते, असा दुहेरी लाभ मिळणार आहे.

आरोग्य विमा

आरोग्य विमा हा आरोग्यावर आलेल्या एखाद्या अडचणीच्या प्रसंगांमध्ये आपल्याला भरपूर साथ देतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा घरातल्या सदस्यासाठी विमा घेता तेव्हा, तुम्हाला तेवढी करात सवलत मिळत नाही. जेवढी तुम्ही आरोग्य विमा घेताना पत्नी आणि मुलांचा समावेश त्यात केल्याने मिळते. कलम 80 डी अंतर्गत तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत कराचा लाभ मिळू शकतो.

जॉईंट जीवन विमा पॉलिसी

लग्नाच्या वेळी सात वचने देताना पती, पत्नीचे संरक्षण करण्याचे देखील तिला वचन देत असतो. मात्र नुसते वचन देऊन चालत नाही तर, त्याद्वारे तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमच्या पत्नीचे आयुष्य सुरक्षित करता याला देखील आजच्या प्रॅक्टिकल युगात महत्त्व आहे. तुम्ही दोघांनी मिळून जॉईंट जीवन विमा पॉलिसी काढली तर, त्यातही तुम्हाला मोठ्या प्रमाणात सवलत मिळू शकते.

जॉईंट विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी प्रीमियमवर अधिक फायदा होतो. त्याचबरोबर, कलम 80 सी अंतर्गत आयकरात सूटही मिळू शकते.

Advertisement