SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. नोकरीत उच्चअधिकार मिळण्याची दाट शक्यता. बोलण्यावर ताबा ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

वृषभ (Taurus): बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्‍यांचा मान राखावा. वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. प्रयत्न केल्यास यश मिळेल. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

मिथुन (Gemini) : अति कामामुळे थकवा जाणवेल. नसते साहस करायला जाऊ नका. प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून लाभ मिळण्याची शक्यता. शत्रू मागे हटतील. कुठल्याही प्रकारची घाई धोकादायक ठरेल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

कर्क (Cancer) : पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघात तुमचा मान वाढेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

Advertisementसिंह (Leo) : दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. जीवावर उदार होऊ नका. विरोधक शांत राहतील. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शुभ दिन. व्यापार व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo) : भावंडांकडून त्रास संभवतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. सहकार्‍यांचा हट्ट पुरवावा लागेल. अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल. जिभेवर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात मन लागेल. नोकरीत यश मिळेल. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

तुळ (Libra) : सगळ्याच कामात दिरंगाई जाणवेल. सहकार्‍यांशी मतभेद संभवतात. कर्ज घेण्याचा विचार टाळावा. जुगारात नुकसान संभवते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. मोठे काम करण्याची संधी मिळेल. अन्नदान करा. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृश्‍चिक (Scorpio) : अति साहस करायला जाऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. व्यवहार करताना जोखीम पत्करू नका. कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका.

Advertisementधनु (Sagittarius) : काही गोष्टी अचानक सामोर्‍या येऊ शकतात. कामानिमित्त दूरच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल. जोडीदाराचा सहवास लाभेल. मित्रांचा सहवास लाभेल. कौटुंबिक समस्या वाढल्याने चिंता वाढेल. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका.

मकर (Capricorn) : मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल. उत्पन्न स्थिर राहील. रोजगार मिळण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

कुंभ (Aquarious) : सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी. व्यापार आणि व्यवसायात यश मिळेल. वाहन किंवा कुठलीही मशीन वापरताना काळजी घ्या. नव्याने आर्थिक नियोनज करावे लागेल. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

मीन (Pisces) : प्रवासात खबरदारी घ्यावी. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नोकरीत यश मिळेल. थोडासा ताण तणाव जाणवेल. आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.

Advertisement