SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी ‘या’ योजना आहेत साक्षात वरदान; जाणून घ्या योजनांची संपूर्ण माहिती

पुणे :

आपल्या देशात कमावणाऱ्या प्रत्येक वर्गासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. गरजू आणि गरीब वर्गाला मदत करणे, हा उद्देश या योजनांमागे असतो. यामध्ये रोजगार, आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक घटकांचा समावेश असतो. देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना सध्या राबविल्या जात आहेत. या योजनांचा शेतकरी वर्गाला थेट फायदा होत असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनांमध्ये भाग घेत आहेत. सध्या या योजनांपैकी पाच योजना या सर्वात लोकप्रिय ठरल्या आहेत. यामध्ये क्रेंद्र सरकारने तीन योजना राबवल्या आहेत तर राज्य सरकारने दोन योजना आणल्या आहेत. यामध्ये पहिली योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना.

Advertisement

 

ही योजना केंद्र सरकार चालवत असून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. दुसरी योजना आहे पीएम किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. मात्र तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागतो. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तिसरी योजना आहे प्रधानमंत्री कुसुम योजना.

Advertisement

 

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के अनुदान मिळते ज्याद्वारे शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा ट्यूबवेल बसवू शकतात. चौथी योजना आहे कूपनलिका योजना. या योजनेअंतर्गत फक्त उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना लाभ मिळतो. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात कूपनलिका बसवू शकतात. पाचवी योजना आहे तेलंगणा सरकारची रयथू बंधू योजना. या योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वार्षिक 10,000 रुपये आर्थिक सहाय्य पाठवते.

Advertisement