SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राहुल द्रविड ‘बीसीसीआय’वरच चिडला..! इंग्लंडविरुद्धचा पराभव जिव्हारी..

भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये एजबॅस्टन येथे झालेल्या कसोटीत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामाेरे जावे लागले.. विशेष, कसोटीच्या तिन्ही दिवस भारतीय संघ आघाडीवर असताना, अखेरच्या दिवशी इंग्लंड संघाने आक्रमक खेळ करताना, टीम इंडियाचा पराभव केला.. नि मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली..

कसोटीतील पराभवानंतर ‘टीम इंडिया’चा मुख्य कोच राहुल द्रविड खूपच निराश झाला होता. पत्रकार परिषदेत बोलताना द्रविडने भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच (BCCI) घरचा आहेर दिला..

Advertisement

राहुल द्रविड काय म्हणाला..?

द्रविड म्हणाला, की “आम्ही इतकं क्रिकेट खेळतोय, की विचार करायला वेळच मिळत नाही. आज मी तुमच्यासमोर क्रिकेटच्या वेगळ्या फॉरम‌टवर चर्चा करतोय नि दोन दिवसांनंतर परिस्थिती वेगळीच असेल, पण या कामगिरीवर आम्ही नक्कीच विचार करू. प्रत्येक सामना हा आमच्यासाठी धडा असतो आणि तुमचा कल काहीतरी शिकण्याकडे असायला हवा..”

Advertisement

Advertisement

“आम्ही कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात चांगली फलंदाजी का करू शकलो नाही, तसेच चौथ्या डावात इंग्लंडच्या 10 विकेट का काढू शकलो नाही, याचा विचार करावा लागणार आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात वारंवार फलंदाजीत अपयश येणे, ही चिंतेची बाब आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय निवडकर्त्यांसोबत बैठक घेणार आहे…”

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ लवकरच बांग्लादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे..

Advertisement

याबाबत बोलताना द्रविड म्हणाला, की ”आता पुढील 6 कसोटी सामने हे आशिया उपखंडात होणार आहेत.. या सर्व मॅच जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचे परिक्षण व्हायला हवं. त्याने पुढील सामन्यांत चुका टाळण्यास मदत होईल व परदेशात खेळताना त्याचा फायदा होईल…”

दरम्यान, भारतीय संघ आता उद्यापासून (ता. 7) इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची वन-डे मालिकाही होणार आहे.. या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला असला, तरी इंग्लंडचे तगडे आव्हान असणार, हे नक्की…!!

Advertisement

भारताचे आगामी वेळापत्रक 

  • इंग्लंड दौरा – जुलै (3 टी-20 व 3 वन-डे)
  • वेस्ट इंडिज दौरा – जुलै/ऑगस्ट (3 वन डे व 5 टी-20)
  • श्रीलंका दौरा – ऑगस्ट (2 टी-20)
  • आशिया चषक-2022 – ऑगस्ट/सप्टेंबर
  • भारत वि. ऑस्ट्रेलिया – सप्टेंबर (3 टी-20)
  • टी-20 वर्ल्ड कप 2022 – ऑक्टोबर/नोव्हेंबर

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement