SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अजून एक सरकारी कंपनी झाली टाटा समुहाची; शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड

मुंबई :

मोदी सरकार आल्यापासून सरकारी कंपन्यांचे आणि संस्थांचे खासगीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. टाटा उद्योगसमूहाने नुकतीच एक सरकारी कंपनी टेक ओव्हर केली आहे. टाटा स्टील लॉँग प्रोडक्ट्स या कंपनीने टाटा समूहाच्या सरकारी मालकीची नीलचल इस्पात निगम लिमिटेड(NINL) या कंपनीचं अधिग्रहण केलं आहे. सोमवारी(3/7/2022) अधिग्रहणाची प्रक्रिया पार पडली. अर्थ मंत्रालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. या बातमीनंतर टाटा स्टील लॉँग प्रोडक्ट्सच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

Advertisement

सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. शेअर मार्केट ओपन झाले तेव्हा सुरुवातीला टाटा स्टील लॉँग प्रोडक्ट्सच्या शेअर्सची किंमत 4.41 टक्क्यांनी वाढून 596 रुपये इतकी झाली होती. यापूर्वी सोमवारच्या अखेरच्या सत्रात हा शेअर 572.50 रुपयांवर बंद झाला होता. 3.96 टक्क्यांच्या तेजीसह हा शेअर 593.60 रुपयांवर खुला झाला होता. टाटा समूहाची कंपनी (NINL)साठी बोलीमध्ये विजयी झाल्यानंतर 10 मार्च रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

त्या करारानुसार ऑपरेशनल क्रेडिटर्स, कर्मचारी आणि विक्रेत्यांच्या थकबाकीशी संबंधित अटी पूर्ण करण्यात आल्या आहेत, असं अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारचा कोणताही हिस्सा या कंपनीत नसल्यामुळं या विक्रीतून सरकारी तिजोरीत कोणताही भर पडणार नाही.

Advertisement

ओडिशातील कलिंगनार येथील (NINL)च्या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता 11 लाख टन इतकी आहे. सतत होत असणाऱ्या तोट्यामुळे मार्च 2020 पासून हा प्लांट बंद होता. टाटा स्टीलने सोमवारी म्हटलं आहे कंपनी नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL)चे कामकाज पुन्हा सुरु करण्यासाठी वेगाने काम करेल.

Advertisement