SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोशल मीडियावर चर्चेत असणारी ‘बझबॉल रणनीती आहे ‘अशा’ पद्धतीची; तीन दिवस बॅकफूटवर राहूनही कसा जिंकला इंग्लंड!

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध इंग्लड कसोटी सामन्यात भारताचा सात विकेट्सनं पराभव झाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात शेवटच्या दिवशी इंग्लडने बाजी मारली. भारतानं दिलेल्या विशेष लक्ष्यचा पाठलाग करताना शेवटच्या दिवशी इग्लंडनं थेट आपल्या बाजूने सामना एकतर्फी करत भारताला जोरदार मात दिली. इंग्लंडच्या संघानं बझबॉल रनणीतीचा वापर करून भारताला पराभूत केलं असं जाणकारांचं म्हणणं आहे. बझबॉल रनणीती काय आहे याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. बझबॉल विचारधारेचा जनक म्हणून ब्रँडन मॅक्युलमला ओळखलं जातं आणि ब्रँडन मॅक्युलम सध्या इंग्लंडच्या संघाचा कोच आहे. बझ हे मॅक्युलमचे टोपण नाव असल्यामुळे या रणनीतीचं नाव बझबॉल असं पडलं.

ब्रँडन मॅक्युलमनं त्याच्या कसोटी कारकिर्दीत आक्रमक फलंदाजीच्या जोरावर नेहमी विरोधी संघावर दबाव टाकत सामने आपल्या संघाच्या बाजूने वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ब्रँडन मॅक्युलमची ही खेळी नेहमीच समोरच्या संघावर भारी पडला असा इतिहास आहे. दरम्यान ब्रँडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली सध्या इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट संघाने याच बझबॉल रणनीतीचा उपयोग भारताविरुद्ध अत्यंत चांगल्या पद्धतीने केला. भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याआधी इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंड संघाचा 3-0 असा क्लीन स्वीप देत पराभव केला होता.

Advertisement

त्यानंतर भारताविरुद्धही बर्मिंगहॅम कसोटीत त्याच रणनीतीचा वापर करत सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्यात इंग्लंड संघ यशस्वी झाला आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन पहिल्या डावामध्ये भारताला 416 धावांवर रोखले होते.

दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 245 धावांपर्यंत मजल मारता आली नंतर इंग्लंडकडून जो रूट (142 धावा) आणि जॉनी बेअरस्टोनं (114 धावा) दमदार खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेऊन सोडत विजय मिळवून दिला.

Advertisement