SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इनव्हिसिबल हेडफोन्स लवकरच होणार लाँच; बघा, कसे आहेत हे अदृश्य हेडफोन्स

जगभरात तंत्रज्ञानामध्ये होत असणाऱ्या प्रगतीमुळे कित्येक गोष्टी बदलत चालल्या आहेत. मोबाईल फोनचा अविष्कार झाला त्यावेळचा मोबाईल आणि सध्याचा मोबाईल यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. मोबाईल सोबत सध्या लावले जाणारे हेडफोन्स देखील दिवसेंदिवस आता बदलत चालले आहेत. आता हेडफोन्समध्ये असा काही बदल होत आहे ज्यावर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. एक कंपनी लवकरचं अदृश्य असणारे हेडफोन्स लाँच करणार आहे. हा हेडफोन कानाला लावला नाही तरी देखील तुम्ही गाण्याचा आनंद घेऊ शकता.

या हेडफोनचा आवाज कोणत्याही वायर कनेक्शनच्या शिवाय तुमच्या कानाला ऐकू येणार आहे. दिसायला हे डिव्हाइस स्पीकरसारखे असले तरी काम मात्र हेडफोनच करत आहे. Noveto N1 हे नेकबँडप्रमाणे नसून तुमच्या डेस्कवर छोट्या साउंडबारसारखा दिसतो. मात्र तो आवाज थेट तुमच्या कानामध्ये ट्रान्समिट करेल. हा हेडफोन बनवणाऱ्या कंपनीने सर्वप्रथम कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये या टेक्नॉलॉजीची झलक लोकांपर्यंत पोहोचवली होती.

Advertisement

Noveto N1 हा प्रोडक्ट इनव्हिसिबल हेडफोनप्रमाणे आपले काम करतो. या डिव्हाईसचं काम म्हणजे हे डिव्हाईस इअरफोनला कनेक्ट व्हायच्या ऐवजी स्मार्ट बिमिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आवाज थेट तुमच्या कानात पोहोचवतो.

या तंत्रज्ञानाच्या मदतीनं अल्ट्रा सॉनिक किरणं युझरच्या कानापर्यंत पोहोचवली जातात. या इनव्हिजिबल हेडफोनची वैशिष्ट्ये म्हणजे याचा आवाज फक्त त्याच व्यक्तीला येतो आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीला ते ऐकू देखील येत नाही. या हेडफोन्समध्ये कंपनीने सर्वप्रथम कंझ्युमर इलेक्ट्रॉ निक्स शोमध्ये या टेक्नॉलॉजीची झलक दाखवली होती.

Advertisement