‘एअरटेल’ आपल्या ग्राहकांना अनेक नवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन लॉंच करत ग्राहकांना भेट देत असते. आता एअरटेलने 4 नवीन योजना लाँच केल्या आहेत. हे प्लॅन्स 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. या एकूण चार रिचार्ज प्लॅनपैकी दोन नवीन स्मार्ट रिचार्ज प्लॅन कंपनीने ग्राहकांना देत आहे.
एअरटेलने लाँच केलेल्या रेट कटर प्लॅनची किंमत 140 रुपयांपेक्षा कमी आहे. सर्वात कमी किंमतीचा प्लॅन 109 रुपयांचा आहे, तर सर्वात जास्त 131 रुपये किंमतीचा प्लॅन आहे. ज्यांना कमीत कमी खर्चात फक्त आपला नंबर सुरू ठेवायचा आहे किंवा इन्कमिंग कॉलिंग चालू ठेवायचं आहे, अशा लोकांनी हा रिचार्ज प्लॅन घेतला तर त्यांना नक्कीच परवडणार आहे. एअरटेलच्या या नवीन प्लॅनसबाबत अधिक माहीती वाचा..
एअरटेलचा 109 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: एअरटेलच्या 109 रुपयांच्या रेट कटर प्लॅनची वैधता एकूण 30 दिवसांची आहे. हे 200MB मोबाइल डेटा आणि 99 रुपयांच्या टॉकटाईम येतो. लोकल, एसटीडी व्हॉईस कॉलसाठी तुम्हाला प्रत्येक सेकंदाला 2.5 पैसे द्यावे लागतील. एसएमएससाठी, 1 रुपये प्रति स्थानिक एसएमएस आणि 1.44 रुपये प्रति एसटीडी एसएमएस भरावे लागणार आहेत.
एअरटेलचा 111 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: Airtel 111 रुपयांच्या स्मार्ट रिचार्जमध्ये तुम्हाला 99 रुपये टॉकटाईम आणि 200 MB मोबाइल डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये लोकल-एसटीडी कॉलची किंमत 2.5 रुपये प्रति सेकंद असणार आहे. स्थानिक एसएमएस 1 रुपये आणि एसटीडी 1.5 प्रति एसएमएस मोजावे लागणार आहेत.
एअरटेलचा 128 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: 128 रुपयांचा एअरटेल प्लॅन 30 दिवसांसाठी वैध असणार आहे. स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी एका सेकंदास 2.5 रुपये आणि इतर कॉलसाठी 5 रुपये प्रति सेकंदास शुल्क लागणार आहे. जर तुम्ही द डेटाचा वापर केला तर वापरलेल्या डेटासाठी रुपये 0.50/MB शुल्क आकारले जाईल, असं कंपनी म्हणते.
एअरटेलचा 131 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: एअरटेलचा 131 रुपयांचा पॅक एका महिन्यासाठी वैध असून स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि इतर कॉलसाठी प्रति सेकंद 5 रुपये शुल्क आकारले जाईल. स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये आणि एसटीडीची किंमत प्रति एसएमएस 1.5 रुपये आकारले जाणार आहे. तसेच डेटाचा वापर केला की, तुम्हाला प्रति एमबी डेटा 0.50 रुपये आकारले जाईल.