SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रेडिट कार्डचे बिल भरू शकला नाहीत तर फिक्र नॉट… हे आहेत मार्ग!

आपल्यापैकी अनेकांकडे क्रेडिट कार्ड असते. त्यावरून आपण विविध प्रकारची खरेदी करतो. मात्र, याच क्रेडिट कार्डचे बिल भरताना अनेकांच्या नाकीनऊ येतात.

ग्राहकांचे अधिकार जाणून घ्या!

◼️ क्रेडिट कार्डचे बिल भरायचे असल्यास ग्राहक मिनिमम ड्यू भरु शकतात. ग्राहकाला ही रक्कम भरणे शक्य नसल्यास, त्यांनी संबंधीत कस्टमर केअरशी संपर्क साधावा. ग्राहकाचे कारण ऐकल्यानंतर कस्टमर केअरकडून काही पर्याय उपलब्ध करुन दिला जातो किंवा मग देय देण्याचा कालावधी वाढवून दिला जातो. ज्यामुळे ग्राहकाला बिल भरण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

◼️ग्राहक क्रेडिट कार्ड बिल भरण्यास सक्षम नसल्यास, कोणताही बँक कर्मचारी त्यांना धमकावू किंवा शारीरिक नुकसान करु शकत नाही. तसेच, ग्राहकाशी सामाजिक आणि सार्वजनिकरित्या गैरवर्तन करू शकत नाही. ते काही अधिकाऱ्यांना रिकव्हरीसाठी ग्राहकांकडे पाठवू शकतात. परंतु ते केवळ ग्राहकाला कर्ज परत करण्यास सांगू शकतात. तसेच, हे लोकं फक्त दिवसा ग्राहकांकडे येऊ शकतात. परंतु रात्री ते ग्राहकांकडे येऊ शकत नाहीत.

◼️ग्राहक हप्ता परत करण्यास सक्षम नसल्यास सुरवातीला त्याला बँकेकडून काही नोटिस दिल्या जातात. कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्या कर्जात जी मालमत्ता गहाण ठेवली आहे, तिचा लिलाव केला जातो आणि बँक त्यांची ठरावीक रक्कम घेतल्यानंतर उरलेले पैसे ग्राहकाला परत करते.

Advertisement