SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; बघा, काय आहेत आजचे ताजे दर

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. लग्नसराई असल्याने अजूनही सोन्याचे दर कमी झालेले नाहीत. मात्र आज आठवड्याच्या मध्यात अचानक सोन्यासह चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सोने खरेदीची सुवर्णसंधी आली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर (Gold rate) प्रति दहा ग्रॅम 51,581 रुपये आहे. चांदीचा दर चांदीचा दर (Silver Price) आज 56,081 रुपये प्रति किलोवर खुला आहे.

Advertisement

शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 52304 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 723 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. तर आज चांदीचा दर किलोमागे 2072 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे.

दरम्यान, आगामी काळात सोन्याच्या दरात दुपटीने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.. पुढील 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाण्याचे संकेत ‘क्‍वाड्रिगा इग्नियो फंड’ (Quadriga Igno Fund) यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Advertisement

सोन्याची शुद्धता कशी तपासावी :-

  • 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
  • 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.
  • 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.
  • 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.
  • 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

(उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर शहरानुसार बदलतात.)

Advertisement