SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरगुती गॅस सिलिंडर महागला, आजपासून नवीन दर लागू..

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात (Domestic LPG Gas Cylinder Price) पुन्हा वाढ झाली आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत अनेक वस्तूंमध्ये दरवाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नवे दर आजपासून लागू झाले असून 14.2 किलो वजनाचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा दर 50 रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर आता 1053 रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. तर 5 किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर 18 रुपयांनी महागला आहे.

Advertisement

देशातील अन्य प्रमुख शहरांचा विचार केला सध्याच्या दरानुसार, दिल्लीत सिलेंडरची किंमत 1053 रुपये झाली आहे. तर, मुंबईत 1052.50 रुपये मोजवे लागणार आहे. कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये सिलेंडरचा दर झाला आहे. पुण्यात 1056 रुपयांवर दर गेले आहेत. यानुसार तुमच्या शहरांतील दर देखील या किंमतीच्या जवळपास असतील.

दरम्यान एकीकडे आज घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. तर दुसरीकडे 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात झाली असून व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement