SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चाणक्य नीती..! श्रीमंत व्हायचंय..? मग ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा..!!

पैसा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पैसा जवळ असेल, तर सगळे नातवाईक, मित्र-मैत्रिणी तुमच्या गरजेला उभे राहतात. पैसा कमावण्यासाठी प्रत्येक जणच मेहनत करीत असतो.. मात्र, कमाई करतानाच पैशांची बचत करणंही तितकंच महत्त्वाचे आहे. जीवनातील कठीण काळात बचतच आधार देते..

आचार्य चाणक्य यांनीही आपल्या नीतीशास्रात याबाबत मार्गदर्शन केलंय. संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी ‘चाणक्य नीती’मध्ये नेमकं काय म्हटलंय, हे सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

संपत्ती टिकवण्यासाठी काय करावं..

पैशांची बचत
चाणक्य सांगतात, की पैसे कमावतानाच त्याची बचतही करावी. पैसे वाचवले नाहीत, तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. गरजेच्या वेळी कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. अशा वेळी तुमची बचतच तुमच्यासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे वायफळ खर्च करु नका.

Advertisement

संपत्तीचा योग्य वापर
लक्ष्मी चंचल मानली जाते, त्यामुळे धनाचा वापर योग्य ठिकाणी, योग्य वेळेनुसार केला पाहिजे. पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्याला एक दिवस संकटाचा सामना करावा लागतो. त्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केलं पाहिजे. पैशाबाबतची माहिती कोणालाही देऊ नये. पैशाचा वापर सुरक्षा, दानधर्म आणि व्यवसायात गुंतवणूक म्हणून करावा.

चुकीच्या मार्गाने कमाई नको
कधीही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याच्या मागे धावू नये. पैशासाठी अधर्माचा मार्ग निवडू नये. अनैतिक काम करून मिळवलेला पैसा फार काळ टिकत नाही. अशा प्रकारे कमावलेल्या पैशामुळे उलट नुकसानच सहन करावे लागू शकते.

Advertisement

दानधर्म करा
पैशामुळे व्यक्तीला सन्मान मिळतो, त्यामुळे कमाईचा काही भाग परोपकारासाठी खर्च केला पाहिजे, दानधर्म केला पाहिजे.. गरजूंना मदत केल्याने व्यक्तीचा सन्मान वाढतो.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement