SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 6 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा मुंबई महापालिकेजवळ अपघात, मुख्यमंत्री सुरक्षित, वाहनांचे किरकोळ नुकसान

✒️ ईडीचे देशभरात विवो व संबंधित कंपन्यांच्या 44 ठिकाणांवर छापे, 110.06 कोटी रुपयांपेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याप्रकरणी कारवाई

Advertisement

✒️ वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप गाडी घुसल्याने अपघात, 12 ते 14 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती; सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर मार्गावर घडली घटना

✒️ उपमुख्यमंत्री होण्यात कमीपणा नाही: शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा होता; देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

Advertisement

✒️ ‘शक्तिमान’ मोठ्या पडद्यावर झळकणार, बिग बजेट सिनेमात रणवीर सिंह सुपरहिरोच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता

✒️ तब्बल 885 किलो गांजा केला जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व नशीराबाद पोलिसांचा संयुक्तरित्या छापा; जळगाव तालुक्यातील पोलिसांची मोठी कारवाई

Advertisement

✒️ केंद्र सरकारच्या नियमानुसार काही मजकूर हटविण्याच्या आदेशांना ट्विटरचं आव्हान; केंद्राकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याचा कर्नाटक उच्च न्यायालयात केला आरोप

✒️ गृह मंत्रालयाकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कैद्यांना सवलतीचा विचार; 50 वर्षांवरील महिला, 60 वर्षांवरील पुरुषांची शिक्षा घटवणार, टप्प्या-टप्प्यांत अंमलबजावणी

Advertisement

✒️ भारतीय संघ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत चीनविरुद्धच्या सामन्यात 1-1 अशा बरोबरीत, भारताची अखेरची साखळी लढत न्यूझीलंडशी होणार

✒️ चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; या चित्रपटाद्वारे सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement