SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ वस्तूंवर लागणार 5 टक्के जीएसटी, घराचं बजेट कोलमडणार..?

देशभरात पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरची दरवाढ होत असताना आता सर्वसामान्य नागरिक, व्यापारी अजून अनेक गोष्टींवरील जीएसटी मध्ये वाढ होणार असल्याचे चित्र दिसल्याने महागाईमुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विक्रीची बाजारपेठ आहे. शेतकरी, व्यापारी व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून देशात जीवनावश्यक वस्तूंवर कोणताही कर नव्हता. खाद्य पदार्थांनाही व्हॅटमुक्त ठेवण्यात आले होते.

प्राप्त माहीतीनुसार, देशात आता 18 जुलैपासून धान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलकडून घेण्यात आला आहे. यामुळे आता महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणीही केली जात आहे.

Advertisement

जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे मध, बटर मिल्क, मख्खन, पनीर, ताक, दही, गव्हाचे पीठ, मध, पापड, अन्नधान्य, मांस, मासे, तांदूळ, डाळ, गूळ, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत अशा अनेक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता असल्याचं कॉन्फरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष बीसी भारतीय यांनी म्हटलं आहे.

काही वर्षांआधी सरकारने केवळ ब्रॅन्डेड धान्यावर 5 टक्के जीएसटी लावला होता. याचा व्यापारी अजूनही विरोध करत आहेत. पण आता सरकारने नॉन ब्रॅण्डेडवरही जीएसटी आकारण्याचा प्रस्ताव पारित करून सर्वांना अचंबित केले आहे. लोकांना सहज उपलब्ध होणाऱ्या आणि आवश्‍यक असलेल्या खाद्यपदार्थांचे भाव वाढणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement