SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आधार कार्डची वैधता किती दिवस..? कधी होते कार्ड ‘एक्सपायर’, जाणून घ्या..!!

कोणतंही सरकारी काम असो वा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी एका दाखल्याची मागणी केली जाते, ते म्हणजे, ‘आधार कार्ड’.. जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी ‘आधार कार्ड’ महत्त्वाचे असते. भारतीय नागरिकांसाठी आधारकार्ड महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे.

‘यूआयडीएआय’द्वारे आधार कार्ड विनामूल्य जारी केले जाते. त्यात व्यक्तीच्या बायोमेट्रिक तपशीलांचा समावेश असतो. आधार क्रमांक हा भारतीय नागरिकाचा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक आहे. आधार कार्ड हे इतर ओळख पत्रापेक्षाही वेगळे आहे.

Advertisement

आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती जमा केली जाते. वाहन चालक परवाना, पासपोर्ट आदींच्या वैधतेसाठी एक कालमर्यादा निश्चित केलेली असते. त्यामुळे अनेकांच्या मनात ‘आधारकार्ड’चीही वैधता किती वर्ष असते, असा प्रश्न पडतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

आधार कार्डची वैधता किती..?
अल्पवयीन मुलांबाबत ‘आधार कार्ड’ची वैधता ठरलेली आहे. 5 वर्षांखालील मुलांना निळे आधार कार्ड दिले जाते. हे कार्ड मूल 5 वर्षांचे होईपर्यंत वैध असते.. त्यात मुलाचे ‘बायोमेट्रिक’ घेतले जात नाही. मूल 5 वर्षांचे झाल्यानंतर बायाेमेट्रिक घेऊन ‘आधार कार्ड’ अपडेट केले जाते. त्यानंतर ते नियमित आधार कार्ड होते.

Advertisement

प्रौढ नागरिकांसाठी मात्र संबंधित व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत ‘आधार कार्ड’ वैध असते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड ब्लॉक करू शकता. मात्र, त्याचे आधार कार्ड सरेंडर करू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच ‘आधार कार्ड’ जारी केले जाते.

गेल्या काही दिवसांत एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त ‘आधार कार्ड’ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशी अनेक कार्ड निष्क्रिय ठरवली आहेत. तुमचे आधार कार्ड वैध आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील टिप्स फाॅलो करा..

Advertisement

अशी तपासा ‘आधार’ची वैधता

  • सर्वप्रथम ‘यूआयडीएआय’च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटवरील ‘आधार सेवा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • होम पेजच्या उजव्या बाजूला ‘Verify Aadhar number’ यावर क्लिक करा
  • समोर येणाऱ्या नवीन पेजवर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • तुमचा सुरक्षा कोड एंटर करा व Verify वर क्लिक करा.
  • तुमचा आधार कार्ड वैध असल्यास आधार क्रमांक दिसेल. वैध नसल्यास हिरव्या रंगाचे चिन्ह दिसेल. म्हणजेच, तुमचे आधारकार्ड निष्क्रिय झाल्याचे समजावे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement