SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शुभ दिन. व्यापार व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता. आज चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

वृषभ (Taurus): जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून लाभ मिळण्याची शक्यता. शत्रू मागे हटतील. कुठल्याही प्रकारची घाई धोकादायक ठरेल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे.

मिथुन (Gemini) : मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नोकरीत यश मिळेल. थोडासा ताण तणाव जाणवेल. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कर्क (Cancer) : जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल. उत्पन्न स्थिर राहील. रोजगार मिळण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

Advertisement



सिंह (Leo) : रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. व्यापार आणि व्यवसायात यश मिळेल. वाहन किंवा कुठलीही मशीन वापरताना काळजी घ्या. नव्याने आर्थिक नियोनज करावे लागेल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा.

कन्या (Virgo) : नसते साहस करायला जाऊ नका. दूर वरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे. नोकरीत उच्चअधिकार मिळण्याची दाट शक्यता. बोलण्यावर ताबा ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

तुळ (Libra) : जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. जोडीदाराचा सहवास लाभेल. मित्रांचा सहवास लाभेल. कौटुंबिक समस्या वाढल्याने चिंता वाढेल. मित्रपरिवारासह वेळ घालवा. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा.

वृश्‍चिक (Scorpio) : जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे. वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. प्रयत्न केल्यास यश मिळेल. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

Advertisement



धनु (Sagittarius) : मित्र-मैत्रिणींना आज घरी जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका.

मकर (Capricorn) : इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा. जिभेवर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात मन लागेल. नोकरीत यश मिळेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा.

कुंभ (Aquarious) : बाहेरील कामातून लाभ होईल. कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. आवडत्या छंदात रमून जाल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. मोठे काम करण्याची संधी मिळेल. अन्नदान करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका.

मीन (Pisces) : नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. व्यवहार करताना जोखीम पत्करू नका. कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

Advertisement