SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेफ्टीसाठी असलेले ‘हे’ Apps नाहीत सुरक्षित; तात्काळ करा डिलीट

मुंबई :

आजच्या काळात युजर्सना मदत करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये कित्येक Apps आहेत. यात काही Apps हे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी डाऊनलोड केलेले असतात. मात्र प्रत्यक्षात यातील काही app अत्यंत धोकादायक असतात. या धोकायदाक App मध्ये पाहिलं नाव आहे Find My Kids Location Trackerचे.

Advertisement

हे Apps लहान मुलांचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी वापरले जाते मात्र यामध्ये एक धोकादायक अशी लिंक सापडली आहे. Phone Track By Number या Apps द्वारे तुम्ही लहान मुलांना ट्रॅक करू शकता. सोबतच फोन देखील ट्रॅक करता येतो. हे App देखील अत्यंत धोकायदाक आहे.

Famisafe हे पॅरेंटल कंट्रोल App आहे. यामध्ये एक नव्हे तर दोन हॅकिंग लिंक सापडल्या आहेत. Find My Phone हे App अँड्रॉइड तसेच App स्टोअरवर देखील उपलब्ध आहे. मोबाईल सिक्युरिटी नेटवर्कने त्याच्या Android आवृत्तीला 45/100 गुण दिले यामध्ये धोकायदाक गोष्टी आढळून आल्या आहेत. MM-Guardian Parent App हे देखील पॅरेंटल कंट्रोल App आहे. या App ला मोबाईल सिक्युरिटीने 43 गुण दिले आहेत. My Family Locator हे सिक्युरिटी अँप आहे.

Advertisement

Users त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ट्रॅक करण्यास सक्षम या App च्या मदतीने होऊ शकतो. या App ला 41 गुण दिले आहेत. Find-My-Kids अँपचा उपयोग मुले त्यांचे पालक आणि कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी करतात. हे App धोकादायक नाही मात्र सुरक्षितही नाही. या App ला मोबाईल सुरक्षा फ्रेमने अवघे 53 गुण दिले आहेत. Family Locator हे App तुमच्या मुलांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे स्थान ट्रॅक करण्यासाठी आणि तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. हे App हॅकर्सशी जोडलेले असल्या कारणाने हे App अजिबातच सुरक्षित नाही.

Advertisement